आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यातील श्रींचा वैभवी रथ ओढणा-या बैलजोडीचा यावर्षी पांडुरंग वरखडे तानाजी वरखडे यांना मिळाला असून त्यांनी रथ ओढण्यास आणलेल्या बैलजोडीची आळंदीत श्री स्वामी महाराज मठ येथून नगरप्रदक्षिणा मार्गे माऊली मंदिर अशी मिरवणूक हरिनाम जयघोषात झाली. यावेळी शहरात ठीक ठिकाणी ग्रामस्थांनी बैलजोडीचे स्वागत पूजा करून केले.
माऊलींचे मंदिर महाद्वारात ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे बैलजोडीची पूजा करण्यात आली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख ऍड विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, माजी नगरसेवक नंदकुमार कुऱ्हाडे विलास घुंडरे, डी. डी. भोसले पाटील, रामदास भोसले, तुषार घुंडरे, विष्णू वाघमारे, ज्ञानेश्वर रायकर, श्रींचे मानकरी योगिराज कुऱ्हाडे, योगेश आरु, मयुर घुंडरे,प्रमोद कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिघे, संदेश तापकीर, नितीन घुंडरे, पुष्प सजावटीचे सेवेकरी सुदीप गरूड, माऊली वहिले, हनुमंत घुंडरे, माऊली गुळुंजकर, गोविंद कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
कोरोनाचे महामारीचे संकट काळाने गेल्या दोन वर्षातील श्रींचा वैभवी पालखी सोहळा मोजक्या भाविकांत अटी शर्तीचे बंधनात झाला. यावर्षी मात्र कोरोनाचे संकट फारसे नसल्याने शासनाने अति आणि शर्ती घालून सोहळ्यास परवानगी दिली असल्याने सोहळा मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरा होणार असल्याचे चित्र आहे. आळंदी देवस्थानचे बैल समितीने दिलेल्या मंजुरी प्रमाणे येथील ग्रामस्थ चेअरमन पांडुरं वरखडे आणि तानाजी वरखडे यांनी श्रींचे सोहळ्याचे वैभव वाढविण्यासाठी रथाची बैलजोडी पुण्यातील फुरसुंगी मधील प्रगतशिल शेतकरी खुडवड यांचेकडून विकत घेतली आहे. या बैलजोडीची आळंदीत भव्य मिरवणूक उत्साहात वाजत गाजत , हरिनाम जयघोषात झाली. यावेळी भाविक,नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्वामी महाराज मठापासून चाकण चौकातून मिरवणूक सुरु झाली. स्वामी महाराज यांचे पुजारी श्रीक्षेत्रोपाध्ये गांधी परीवारांतर्फे पुजा करण्यात आली.