स्कुल व्यवस्थापनाने नियमानुसार नोटीस द्यावी – जयदीप निकम
हडपसर प्रतिनिधी
मगरपट्टा जवळील एचडीएफसी शाळेत कोणतीही पूर्व सूचना न देता बस कंत्राटदारास मेल करून कंत्राट रद्द केले, शाळेच्या व्यवस्थापनाने चुकीचे आरोप करून आमच्यावर अन्याय केला आहे, करारनुसार आम्ही काम करत असून 90 दिवसाची पूर्व सूचना न दिल्याने आम्ही न्यायालयात जाणार असा इशारा कंत्राटदार जयदीप निकम यांनी दिला आहे.
मगरपट्टा मधील द एचडीएफसी स्कूल मध्ये कंत्राटदार अनेक वर्षापासून बसच्या चालकांचे कंत्राट काम करत आहे व्यवस्थापनाने अनधिकृत रीत्या जास्त कमिशनची मागणी केली त्यास नकार दिल्याने कंत्राट बंद केल्याचा मेल पाठविला या संदर्भात माहिती घेण्यासाठी शाळेजवळ गेले असता गेटच्या आत येण्यास मज्जाव केला व पोलिसांना आणि प्रसिद्धीमाध्यमांना आम्ही पालकांना कोंडून ठेवले अशी चुकीची माहिती दिली असे कंत्राटदार जयदीप निकम यांनी सांगितले.
बस चालकांचे पाच वर्षाचे कंत्राट असून याचा करार झाला आहे त्यामध्ये 90 दिवसाची नोटीस देऊन करार रद्द करता येतो परंतु अचानक आम्हाला मेल करून कंत्राट रद्द केल्याची कळविले दोन महिन्याचे थकीत बिलही दिलेली नाही असा आरोप कंत्राटदार जयदीप निकम यांनी केला आहे.
आज सकाळच्या सुमारास कंत्राटदार जयदीप निकम, चालक, सुपरवायझर त्या ठिकाणी पोहोचले व्यवस्थापनाने पोलिसांना कळवून आमचे कोणते म्हणणे ऐकून न घेता तिथून आम्हाला बाजूला केल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक अरुणा हरपळे, अभिजीत कदम, जयदीप निकम, प्रतीक बर्गे, महेश मोहिते, नचिकेत मोरे, वैभव भगत, मुकेश शेंडकर, अंकिता सातव, ज्योती तोडकर, रेखा पोळी, उमेश भडकवाड उपस्थित होते
द एचडीएफसी स्कूल मध्ये पहिली ते दहावी 1270 विद्यार्थी असून 32 बसेस या शाळेत आहेत अचानक कंत्राट रद्द केल्याने 32 चालक तीन सुपरवायझर व व्यवस्थापक यांच्या रोजी रोटीचा प्रश्न ऐरनीवर आला आहे, या संदर्भात व्यवस्थापन आणि न्याय भूमिका घेतली नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी मंत्री बच्चू कडू, यांच्याशी पत्र व्यवहार केला आहे आमच्या न्याय मागण्यासाठी आम्ही न्यायालयाच्या दरवाजा ठोठावणारा असा इशारा कंत्राटदार जयदीप निकम यांनी दिला आहे.