अनिल चौधरी , पुणे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांना अभिवादन करून उंड्री येथील ह.भ प. गणेश महाराज पुणेकर यांनी कोंढवा खुर्द ग्रामस्थ आणि भजनी मंडळ आयोजित श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरा जवळील अखंड हरिनाम सप्ताह येथे आपली कीर्तन रुपी सेवा आयोजित करण्यात आली होती , याप्रसंगी पुणेकर महारांजानी अतिशय उत्कृष्ट निरूपण सेवा देऊन उपस्थित वारकरी , ग्रामस्थ आणि तरुणांना भजन, कीर्तन, प्रवचन आणि नामस्मरणात तल्लीन केले होते. यावेळी त्यांनी जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचे आचार- विचार आमलात आणून आपले मनुष्य रुपी जीवन जगण्याचा उपदेश दिला.
कोंढवा खुर्द ग्रामस्थांच्या वतीने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहाळा दि. ४ ते १२ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. यामध्ये गणेश महाराज पुणेकर, चंद्रकांत महाराज यादव, गणेश महाराज आवजी , बाळासाहेब महाराज शेवाळे, लक्षमण महाराज देवकर , सुनील महाराज कामठे, महादेव महाराज स्वामी, सोमनाथ महाराज गांगर्डे, जगन्नाथ महाराज देशमुख यांची प्रामुख्याने कीर्तन रुपी सेवा होणार आहे तसेच काल्याचे कीर्तन निलेश महाराज माने(आळंदी )यांचे होणार आहे.
याप्रसंगी निरूपण करताना पुणेकर महाराज म्हणाले कि , हा कीर्तन महोत्सव हे चंदन आहे. त्याचा सुगंध दरवळतो आहे. कारण हे ठिकाण एक मंदिर आहे. मंदिर म्हणजे मंगलता, दिव्यता व रम्यता आहे. त्यात दरवळणारा सुगंध म्हणजे कीर्तन. यातून पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अलंकापुरीचे संत ज्ञानेश्वर माउली यांचा अभंग घेतला आहे. लंकापूरचा राजा रावण होता. पण, अलंकापूरचा राजा संत ज्ञानेश्वर माउली आहेत. म्हणूनच त्यांनी, ‘अवघाचा संसार सुखाचा करीन’ अशी प्रतिज्ञा केली आहे. ‘ ते सर्वांचे माहेर आहे. आणि माहेरीच सुख आहे. म्हणूनच पंढरपूरची वारी करायची असते. संत सानिध्यात राहिल्याने आपलया दैनंदिन जीवनात प्रचंड फरक पडत आहे. यावेळी हवेली तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.