Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीपुण्यात अनोख्या "साडी रन" चे आयोजन. साडी नेसुन धावल्या ५३०० महिला! 

पुण्यात अनोख्या “साडी रन” चे आयोजन. साडी नेसुन धावल्या ५३०० महिला! 

साडी रन, पहिल्यांदाच पुण्यात!

प्रतिभा कुमारी,पुणे 

आज १६ एप्रिल रोजी पुण्यातील खशाबा जाधब क्रिडा संकुल येथे महिलांसाठी ‘साडी रन’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरातील जवळपास ५,३०० महिला साड्या परिधान करून या साडी रन मध्ये धावल्या. साडी नेसुन जर स्त्री सगळी कामे करू शकते तर साडी रन मध्ये देखील धाऊ शकते या अनोख्या संकल्पनेसह या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 

ज्यात साडी नेसुन धावणाऱ्या महिलांनी समाजास स्त्री शक्तीचा आणि आरोग्याचा संदेश दिला आहे. ‘तनाएरा साडी रन’ ही मोहीम स्त्री शक्तीचा सर्वांगीण गौरव आहे. यात खडकी, पिंपरी, आळंदी खडकवासला आणि इतर शेजारच्या शहरांमधून देखील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. आरोग्याचा संदेश देणाऱ्या रंगीबेरंगी साड्यांच्या झगमटातील या साडी रन ने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

तनाएरा साडी रन’ केवळ महिलांसाठी आयोजित केला जातो, जो त्यांच्या क्षमतेस जगासमोर अनोख्या स्वरूपात प्रस्तुत करण्याचा खास उत्सव आहे. पिढ्यान पिढ्या परिवारास आणि अनुषंगाने समाजास घडवणाऱ्या स्त्रिया स्वत:मध्ये परिवर्तन करून प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या महत्त्वाच्या भूमिका बजावतात, आणि याची गुरुकिल्ली असते संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य आणि तंदुरुस्ती. त्यांना आरोग्याचे महत्त्व कळते पण त्यांच्या अनेकदा स्वत:च्या फिटनेसला प्राधान्य देता येत नाही. फिटनेस कडे लक्ष देताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. 

भारतातील महिलांना एकत्र आणणासाठी साडीपेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही. साडी हा भारतीय स्त्रियांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे. वय, जात, पंथ आर्थिक पार्श्वभूमी इत्यादी सर्व बाबींना मोडीत काढुन साडी ही स्त्रियांना एकत्र आणते. त्यामुळे साडी रन हे त्यांची आव्हान स्विकारण्याची क्षमता दाखविण्याचे आणि फिटनेससाठी उपाय शोधण्याचे व्यासपीठ आहे.

ही मोहीम बेंगळुरू स्थित फिटनेस कंपनी, जे जे एक्टीव्ह (JJAactive) द्वारे आयोजित केली जाते, ज्यांचे फिटनेस सेंटर्स भारतभर आहेत. जे जे एक्टीव्ह गेल्या ७ वर्षांपासून बेंगळुरूमध्ये या साडी रनचे आयोजन करत आहेत आणि त्यांनी पहिल्यांदाच हा कार्यक्रम पुण्यात आणला आहे. या वर्षी देशातील ५ अन्य शहरांमध्ये देखील होणार आहे. आई आणि मुलीची जोडी, मैत्रिणींचे ग्रुप, सासू आणि सूनेची जोडी, कुटुंबातील अनेक सदस्य, महिलांच्या ३ पिढ्या जसे आई, मुलगी, नात यांचा सहभाग यावेळी दिसुन आला आहे. 

अनेक महिलांनी रविवारच्या सकाळी आयोजित झालेल्या या साडी रनचा आनंद घेतला. AWWA, Pinchi, इत्यादी सारख्या मोठ्या महिलांच्या ग्रुप्स ने यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी अनेक स्त्रियांनी फिटनेसच्या समर्थनार्थ पुढे येऊन अनेकांना प्रोत्साहीत केले आहे.

सामाजिक अडथळे दूर करण्यासाठी आणि फिटनेसकडे वैयक्तिकतपणे लक्ष देण्यासाठी महिलांनी घेतलेली ही एक मोठी झेप आहे.

१६ एप्रिल २०२३ रोजी खशाबा जाधव क्रिडा संकुल, पुणे विद्यापीठ येथे आयोजित तनाएरा साडी रनच्या या फस्ट एडीशनच्या फ्लॅग ऑफ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे होते- 

१) डॉ. गीताली टिळक – कुलगुरू २) डॉ मेधा कुलकर्णी, प्राध्यापिका, माजी आमदार ३) आरती बनसोडे – एसीपी खडकी ४) डॉ. सुचित्रा काटे, आयरन मैन, सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या आयोजकांपैकी एक ५) दीपा हिरे, राष्ट्रीय धावपटू ६) विभावरी देशपांडे – अभिनेत्री ७) अश्विनी गिरी – अभिनेता ८) सुबीना अरोरा AWWA अध्यक्षा दक्षिण कमांड ९)मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर, जागतिक बुद्धिबळ विजेत्या.

यावेळी ५३०० पेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!