पुणे प्रतिनिधी,
· GIVA, भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उत्तम दागिन्यांच्या ब्रँडने पुण्यातील विमान नगर येथील फिनिक्स मार्केट सिटी येथे पहिले ज्वेलरी एक्सपिरियन्स सेंटर उघडले. या स्टोअरचे उद्घाटन लोकप्रिय टेलिव्हिजन स्टार कविता कौशिक आणि GIVA च्या सह-संस्थापक निकिता प्रसाद यांच्या हस्ते झाले.
GIVA (जीवा) या एक्सपिरियन्स सेंटर मध्ये ग्राहकांना नैतिक हिऱ्यांसह प्रीमियम १४K आणि १८K -हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या डिझाईन्ससह एक अनोखा आणि उत्तम शॉपिंग अनुभव मिळणार आहे. GIVA च्या नैतिक पद्धतींबद्दलची वचनबद्धता हि विवादमुक्त आणि नैतिक हिऱ्यांच्या वापरातून दिसून येते, त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या दागिन्यांचा आनंद हा उत्तम रित्या घेता येतो. GIVA स्टर्लिंग सिल्व्हरमध्ये ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर, गोल्ड आणि रोझ गोल्ड प्लेटेड ज्वेलरीसह अनेक डिझाइन्स ऑफर करतो.
या कार्यक्रमात GIVA (जीवा) च्या सह-संस्थापक निकिता प्रसाद म्हणाल्या,”एक ब्रँड म्हणून आम्ही केवळ सुंदर दिसणारे दागिने नाही तर आमच्या ग्राहकांना आत्मविश्वास आणि विशेष वाटेल असे डिझाईन्स तयार करतो याचा आम्हाला अभिमान वाटतो. पुण्यातील आमचे पहिले ज्वेलरी एक्सपीरियंस सेंटर सुरू करून, आम्ही आमच्या नैतिक हिरे आणि सोन्याच्या उत्कृष्ट दागिन्यांचे डिझाईन्स प्रदर्शित करण्यास उत्सुक आहोत. आमचे उद्दिष्ट आहे की, आमच्या ग्राहकांना एक अनोखा, परस्पर खरेदीचा अनुभव प्रदान करणे आणि त्यांना आमच्या दागिन्यांसह मनमोहक आठवणी निर्माण करण्यात मदत करणे.” पुढे त्या म्हणाल्या की “आम्ही संपूर्ण भारतामध्ये आमच्या ब्रँडचा नवनवीन शोध आणि विस्तार करण्यास उत्सुक आहोत.”
GIVA चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक, इशेंद्र अग्रवाल म्हणाले, “पुण्यात आमचे पहिले स्टोअर उघडताना आणि आमच्या उत्तम दागिन्यांचे कलेक्शन आणताना आम्हाला आनंद होत आहे. प्रत्येक वेळी आमचे उद्दिष्ट हे आहे की नावीन्यपूर्ण दागिने आणि ग्राहकांचे समाधान.आम्ही या शहराला दागिने खरेदीचा उत्तम आनंद देण्यास उत्सुक आहोत, जो इतर शहरात अनुभवायला मिळणार नाही.”
भारतात ज्वेलरी मार्केट मध्ये वार्षिक ५-६% च्या स्थिर दराने वाढत आहे. २०२५ पर्यंत १०० डॉलर अब्ज पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी ब्रँडपैकी एक म्हणून, GIVA (जीवा) देशभरात ४० हून अधिक ऑपरेशनल स्टोअर्ससह, डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण भारतामध्ये १०० स्टोअर्स उघडण्याची योजना आखत आहे. GIVA आपल्या ग्राहकांना दैनंदिन जीवनात अधिक सुखद व त्यातील विशेष क्षण स्मरणीय बनवण्यासाठी उत्कृष्ट दागिने प्रदान करण्यास GIVA वचनबद्ध आहे.