Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेवारकरी सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा : योगगुरू दीपकजी महाराज 

वारकरी सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा : योगगुरू दीपकजी महाराज 

अनिल चौधरी पुणे ,

ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने वारकऱयांच्या सेवेसाठी अत्याधुनिक पद्धतीने मसाज सेवा , स्टीम सेवा, मालिश आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषधे वाटप तसेच फराळ वाटप सासवड येथे करण्यात आले यावेळी आपल्या साधकांना मार्गदर्शन करताना वारकरी सेवा म्हणजेच साक्षात पांडुरंगाची सेवा आपण करत आहोत त्यामुळे वारकारयांना सेवा द्यायला कायम तत्पर रहा असे गुरुदेव दिपक शिळीमकर म्हणाले. 

गीता भागवत करिती श्रवण !
अखंड चिंतन विठोबाचे !!
तुका म्हणे मज घडो सेवा !
तरी माझ्या दैवा पार नाही !!

   अवघ्या महाराष्ट्रांच सांस्कृतिक वैभव म्हणजे वारी…  वारीचा श्वास म्हणजे त्यात सहभागी होणारा वारकरी ..  वारकरी संप्रदायात सेवेला फार महत्व आहे. त्यात वारी काळात सेवा करण्यासाठी हजारो हात सरसावतात . श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात लाखो भावी सहभागी होतात. यामध्ये पुणे ते सासवड हे मोठे अंतर कापणे वारकरी बांधवांसाठी थोडे जड जाते कारण मध्ये असलेला दिवे घाट. ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात वारकरी हा  घाट मोठ्या  उत्सहात पार करतात पण पुणे ते सासवड हे अंतर जवळपास ३२ किलोमीटर आहे यामुळे घाट चडून वर आल्यानंतर वारकऱयांची  खऱ्या अर्थाने सेवा करण्याची संधी ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या साधकांना मिळते . सासवड जवळील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्सहात ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने वारकऱयांसाठी मोफत मसाज , स्टीम थेरपी , मोफत औषधे , तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी तसेच फराळ वाटपाचे काम करण्यात आले. यावेळी हजारो वारकऱ्यानी याचा फायदा घेतला तसेच साधकांना आशीर्वाद देऊन पुढील वर्षी देखील आपल्या हातून अशीच सेवा घडो अशी आशा यावेळी व्यक्त केली. 
 
याप्रसंगी ब्रम्हमुहूर्त योग केंद्राचे योगगुरू दिपकजी शिळीमकर, गुरुमाऊली वैशालीजी ,अध्यक्ष शशिकांत आनंदास , अश्विनी पासलकर , सुधीर गरुड,आरती कदम, पायगुडे सर, येनगुल सर, दादा रणदिवे, जनसेवक राजेंद्र भिंताडे, शशिकांत पुणेकर, संतोष गोरड ,विजय लोणकर, कालिदास लोणकर, उर्मिला भालेराव, संदीप भिलारे , रेश्मा थोपटे, प्रतिभा चौधरी, शोभा गोसावी ,अनिल राऊत,शिल्पा येनगुल,दिवाकर गोरे मोहिनी कातरगी,मयूर ढोकळे,आशा दांगट ,सागर आनेचा,अर्चना कोलते, संदिप राऊत, रेखा नागरगोजे, नलिनी वंजारी ,डॉ विक्रांत लाटे, डॉ वाघमोडे सर , डॉ वाघमोडे मॅडम  सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!