पुणे प्रतिनीधी,
पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र महोत्सव वार्षिक कार्यकारणी बैठक हडपसर येथे नुकतेच पार पडली या बैठकीमध्ये नवरात्र महोत्सवाच्या 2023 – 2024 सालासाठी सर्वानुमते अध्यक्षपदी हेमंत ढमढेरे, कार्याध्यक्षपदी अनिल मोरे, उपाध्यक्षपदी संजय मेहता,
यांची निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी दयानंद राऊत, राजेंद्र गायकवाड, खजिनदारपदी राजेंद्र तुपे, सेक्रेटरी सुमंतराव तुपे, उत्सव प्रमुख मारुती भुजबळ, मिरवणूक प्रमुख निलेश मानकर, मंडप व्यवस्था बिराजदार मामा, गलांडे मामा, सावता मामा, जाहिरात व प्रसिद्धी प्रमुख पदी सुशील भिसे यांची निवड करण्यात आली.
यावेळी संस्थापक कार्यकारणी अध्यक्ष बाळासाहेब भिसे, कार्याध्यक्ष शैलेंद्र नवले, उपाध्यक्ष प्रीतम बडदे, सेक्रेटरी राजेंद्र तुपे, आदींसह हडपसर परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नविन कार्यकारणी मंडळाचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
सामाजिक उपक्रमांनी नवरात्र उत्सव साजरा करणार…
हडपसर मधील नवरात्र महोत्सव हडपसर पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारा उत्सव आहे, भाजीपाला व्यापारी, कष्टाकरी या उत्सवात मोठ्या हिरीरीने सहभागी होतात आगामी उत्सव सामाजिक उपक्रमांनी साजरा करणार वा सर्वाना सामावून घेणार…
हेमंत ढमढेरे
अध्यक्ष – पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र महोत्सव
हडपसर पंचक्रोशीला साजेसा नवरात्र महोत्सव…
हडपसर मधील पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र महोत्सव सर्वसामावेशक आहे, बाळासाहेब भिसे यांनी सर्वांना काम करण्याची संधी दिली यावर्षी मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करणार तसेच कष्टकऱ्यांच्या यशस्वी मुलांचा सन्मान उपक्रम राबविणार..
अनिल मोरे
कार्याध्यक्ष – पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र महोत्सव