Friday, March 21, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीबी एल मानकर संस्थेतर्फे गोरगरीब नागरिकांना दिवाळी फराळ वाटप

बी एल मानकर संस्थेतर्फे गोरगरीब नागरिकांना दिवाळी फराळ वाटप

पुणे प्रतिनिधी

भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि उज्वल सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक आहे. हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे, दागिने, फराळ या गोष्टींबरोबर हा सण साजरा करतात. पण समाजात काही कुटुंब अशी आहेत कि ते केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे सण साजरा करू शकत नाहीत. सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी बी एल मानकर सामाजिक संस्थेतर्फे पुण्यातील विविध भागातील गोरगरीब नागरिकांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. तसेच पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आरोग्य कर्मचारी यांना देखील दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना बी एल मानकर संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब मानकर म्हणाले कि, दरवर्षी समाजातील गरजू व गरीब कुटुंबांना आमच्याकडून मोफत फराळ वाटप करण्यात येतो. याप्रकारे त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण देण्याचा आमचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होतो. त्यानुसार यंदाही आम्ही समाजातील गोर गरीब तसेच पुणे मनपाचे सफाई कर्मचारी यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीने वर्षभरात आरोग्य शिबिरे तसेच विविध उपक्रम राबविले जातात

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!