Thursday, April 24, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :

पुणे आळंदी या पालखी मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रीगुरू निवृत्तींनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रा व श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ति प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिना निमित्त अखंड हरिनाम सोहळा ६ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थांन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर , खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
सोहळ्याचे काळात श्रींची महापूजा, काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्री गाथा पारायण , महिला भजनी मंडळाची भजने ,हरिपाठ, हरिकीर्तन व हरी जागर असे कार्यक्रम होणार आहेत. या शिवाय मान्यवर कीर्तनकार यांची कीर्तन सेवा संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहेत. यामध्ये गोरक्षनाथ महाराज वर्पे, महारुद्र महाराज रेडडे, बालाजी महाराज मोहिते, संतोष महाराज काळोखे, लक्ष्मण महाराज पाटील, आधार महाराज कुमावत, ज्ञानेश्वर महाराज करंजीकर, ओम महाराज अटकळ, हरिदास महाराज पालवे, बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे काल्याचे कीर्तन सेवेने सप्ताहाची सांगता होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी भाविकांना महाप्रसाद वाटप होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी दिली. सप्ताहात सहभागी होवून श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड. तापकीर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!