अनिल चौधरी, पुणे
पुणे बालेवाडी येथे सरकारचा लाडकी बहीण योजना मोठ्या थाटामाटा मध्ये कार्यक्रम घेण्यात आला, योजना राबवत असताना पुणेकरांना मात्र तीन चाकाच्या सरकारने वेठीस धरले या योजनेसाठी PMPL बस सेवा तब्बल २०० कार्यक्रमाला बोलवण्यात आल्या होत्या पुणे शहरामध्ये बस सेवेचा वेळापत्रक कोलमडल PMPL ने कुठलीही सूचना नागरिकांना न देता बालेवाडी येथे गाड्या पाठवण्यात आल्या त्यामुळे बस स्टॉप वर मोठी गर्दी पाहायला मिळाली तासंतास बस स्टॉप वर पुणेकरांना बसची वाट पहावी लागली लाडकी बहीण योजना राबवताना सरकारमध्ये गोंधळ उडताना मात्र दिसत आहे. सरकारने बहिणीकडून बँक डिटेल्स मागवण्यात आले, परंतु बहिणीच्या खात्यात पैसे न जाता दाजींच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग करण्यात आले. DBT नसल्यामुळे हा गोंधळ उडताना दिसतोय. परंतु खाते नंबर सरकारने घेतले असून देखील मोबाईल नंबर च्या आधारे पैसे खात्यामध्ये वर्ग करण्याचे काम या सरकारने केले दाजींच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळे बहिणींमध्ये सरकार विरुद्ध नाराजीचा सूर उगवताना दिसतोय असे वक्तव्य आम आदमी पार्टी शहराध्यक्ष अनुसूचित जाती प्रशांत कांबळे यांनी केले