“राज्यात महिला, मुली असुरक्षित राज्य सरकार अपयशी – शहराध्यक्ष प्रशांत जगताप

74

आरोग्य विश्वास पुरस्कार सोहळा संपन्न उत्साहात

अनिल चौधरी, पुणे 

आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे, विश्वास इन्स्टिटयूट ऑफ पॅरामेडिकल कॉलेज सायन्स तिसरा राज्यस्तरीय विश्वास पुरस्कार वितरण सोहळा हडपसर येथील नोबेल एचएमए भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. प्रसाद कोद्रे होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पदवीधर जिल्हाध्यक्ष प्रविण आल्हाट, किरण गाडेकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी राज्यस्तरीय क्रिडा विभाग विजय कोद्रे, नारी शक्ती अश्विनी शेवाळे, कृषी सागर मेमाणे, सामाजिक डॉ.गणेश राख, कला आरजे अभय, आरोग्य स्वाती आंबेकर, उद्योग महेश जाधव, तसेच गुणवंत विद्यार्थ्यामध्ये कुणाल ठाकरे, प्रतीक कांबळे, सागर बुलाखे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
नियोजन प्रसाद शिंदे, तीर्थराज शिंदे, प्रफुल्ल कोद्रे, विजय साळवे, महेश घुले,दर्शन इशी, संदीप मेमाणे, नम्रता बारवकर, प्रथमेश देवकर, गौरी तावरे, पांडुरंग बन्नर, प्रतीक्षा चव्हाण यांनी केले.
विद्यार्थ्यांना रोजगार व स्वावलंबी करण्याचे काम आरोग्य विद्या प्रसारक मंडळ करत असल्याचे आयोजक ॲड.प्रसाद कोद्रे यांनी सांगितले.
महिला सुरक्षा महत्वाची असून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, विद्यार्थी भयभीत असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत, महायुती सरकार हद्दपार करण्याची वेळ आली आहे असे सांगून ॲड.प्रसाद कोद्रे यांच्या संस्थेच्या कार्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कौतुक केले.
सूत्रसंचालन सावली थोपटे यांनी केले
आभार नम्रता बारवकर यांनी मानले.
आरजे अभय यांनी विद्यार्थ्यांचे चांगलेच मनोरंजन केले. नृत्य करून मुला – मुलींनी मुक्त आनंद घेतला.