कोंढवा प्रतिनिधी
उंड्री (ता. हवेली) येथील उद्योजक राजेंद्र भिंताडे यांची मंगळवार पेठेतील राष्ट्रीय तालीम संघाच्या २०२४-२८ दरम्यान कार्यकारी मंडळावर काम करण्यासाठी सभासदपदी नियुक्ती करण्यात आली. भिंताडे यांना नुकतीच मनपा शासननियुक्त सदस्य म्हणून संधी दिली. याप्रसंगी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. तात्यासाहेब भिंताडे, हिंद केसरी, पै. योगेश दोडके, पै. गुलाबराव सोनवणे, पै. विलास कातुरे, उपाध्यक्ष पै. अविनाश टकले, पै. शिवाजी बुचडे, सचिव पै. मधुकर फडतरे, पै. जयसिंग पवार, पै. रविंद्र खालकर, पै. योगेश पवार, पै. सोमनाथ मोझे, दादासाहेब कड उपस्थित होते. भिंताडे यांनी उंड्री गाव आणि परिसरामध्ये चांगले सामाजिक काम उभे केले आहे. त्याची दखल घेऊन शासनाने त्यांनी मनपा सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.