पुणे:
महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने कसबा पेठ भोई आळी येथील वाडा संस्कृती जपणाऱ्या विर मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे ३० रक्तदात्यांनी सहभाग घेतला. यात महिलांचाही सहभाग होता. या प्रसंगी विर मित्रमंडळ अध्यक्ष राजेंद्र सोनार, उपाध्यक्ष प्रणय तोरस्कर, कार्याध्यक्ष तनिष्क ससाणे, विकास दरवडे, विशाल जराड,अक्षय सोनार, आयुष चव्हाण, गजानन महाडिक, अलोक परदेशी, प्रशांत वडके, मयूर तारू, प्रवीण कांगोकर आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाचे हे हिरक महोत्सवी वर्ष असून गेली ३० वर्ष विना खड्डा मांडव (हा लोखंडी पाईप व नट बोल्टचा आहे), भंडारा, विविध गरजू संस्थांना मदत, वृक्षारोपण असे सामाजिक व सांकृतिक कार्यक्रम राबवीत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
छायाचित्र : विर मित्र मंडळ रक्तदान शिबीर.