टोपे दाम्पत्याने घरच्या गणपती सजावटीत केली “जलसाक्षरता सजावट.”

34

पुणे

घरच्या गणपती समोर नागरिक विविध प्रकारे सजावट करतात. नांदेड सिटी मधील अनंत टोपे व संजीवनी टोपे या दाम्पत्याने आपल्या घरातील गणेश सजावटीत “जल साक्षरता” हा देखावा उभारला आहे यात देखावे,चित्रे,वृक्ष वनस्पती,याचा समावेश आहे.संजीवनी टोपे यांनी लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधन व एकत्रीकरण बरोबरच संदेश देण्यासाठी या उत्सवाची सुरुवात केल्याचे सांगून आपण गेली तीन वर्ष वेगवेगळ्या विषयावर देखावे बनवत आहोत असे नमूद केले.पहिल्या वर्षी ग्लोबल पीस,दुसर्या वर्षी देवळांचे स्थापत्यशास्त्र तिसऱ्या वर्षी हॅपीनेस व वेल बिंग आणि यावर्षी “जल साक्षरता”यात पाण्याशी मैत्री करा,पाणी जपून वापरा असा संदेश आहे. दररोज शेकडो नागरिक हा देखावा पाहण्यास भेट देत आहेत.(श्री अनंत टोपे हे आद्य स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांचे थेट वंशज आहेत.)