स्नो मॉन्ट ब्लॅँक पुणे सिटीचे उद्घाटन संपन्न.

27

कोविड काळात सर्व संपर्क ऑन लाईन होता,तेव्हा उद्योजकांनी मदतीसाठी परस्पर संपर्कासाठी स्नो ग्लोबल बिझनेस कम्युनिटीची स्थापना केली होती. कोविड संपल्यानंतर ही ते कार्य सुरु राहिले व वाढत गेले. आज याचे २३ देशात २५०० सदस्य आहेत.याची सुरुवात डॉ.दीपक तोष्णीवाल यांनी केली होती. आज या संस्थेच्या “स्नो मॉन्ट ब्लँक पुणे सिटी” शाखेचे उद्घाटन माजी इन्कम टॅक्स कमिशनर के.एन बोरा यांच्या हस्ते करण्यात आले. वायसीएम डेक्कन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पुढील पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष डॉ.दीपक तोष्णीवाल. आफरीन खान यांची डेप्युटी मेयर पदी, प्रवीण हेबारे यांची अध्यक्षपदी, देवाशिष कनोजिया उपाध्यक्षपदी, तर योगिनी वैद्य यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. विविध क्षेत्रांतील सुमारे ५० उयोजक या प्रसंगी उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना के.एन बोरा यांनी उद्योजकांनी परस्परांशी स्पर्धा मैत्रीपूर्ण व परस्पर सहकार्यांने केल्यास उद्योग व्यवसायाची वाढ मोठ्या प्रमाणात होते असे प्रतिपादन केले.
छायाचित्र : पदाधिकारी व सदस्य.