नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

206

कोंढवा प्रतिनिधी

नराधम पिताच आपल्या१७ वर्षाच्याअल्पवयीन मुलीवर जवळपास वर्षभर लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाआहे.घरात कोणाला काहीही सांगायचेनाही,नाहीतर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आणीन, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती.त्यामुळे मुलगी जवळपास वर्षभर आपल्या बापाचा अत्याचार सहन करत होती.

याबाबत एका१७ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीआहे. त्यावरुन पोलिसांनी३७ वर्षाच्यावडिलांवर पोस्कोअंतर्गत गुन्हादाखल केलाआहे.हाप्रकार डिसेंबर २०२३ ते२३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सुरुहोता.

याबाबत पोलिसांनीदिलेल्यामाहितीनुसार, फिर्यादीही अल्पवयीन असल्याचेमाहिती असतानाही तिच्या वडिलांनी फिर्यादीला हाताने मारहाण करुन बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घरात कोणालाही काहीही सांगायचे नाही, नाहीतर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आणीन, अशी धमकी  दिली. फिर्यादीशी वारंवार शरीरसंबंध ठेवून तिला शारीरीक व मानसिक त्रासदिला.

हीबाब तिच्या आईला माहिती झाली. पण, या नराधमाच्या भिती पायी ती काही करु शकत नव्हती.शनिवारी सायंकाळी त्याने या मुलीवर पुन्हा अत्याचार केला. हा असहाय्य प्रकार तिची आई जेथे घरकाम करते, त्यांना सांगितला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आई मुलीला घेऊन कोंढवा पोलीस ठाण्यात आली. हातपास सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबरकरीत आहेत.