Friday, June 13, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीउंड्री मनपा शाळेतील विद्यार्थ्यानी यशाची उत्तुंग भरारी घ्यावी ; जयश्री पुणेकर

उंड्री मनपा शाळेतील विद्यार्थ्यानी यशाची उत्तुंग भरारी घ्यावी ; जयश्री पुणेकर

अनिल चौधरी , पुणे

मनपा प्राथमिक विद्यालय, उंड्री या शाळेत पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित विभागस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला . यावेळी उंड्री मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडाप्रकारांमध्ये प्राविण्य मिळवले होते , याप्रसंगी विद्यार्थाना बक्षिस वितरण सोहळा जयश्रीताई पुणेकर यांच्या हस्ते पार पडला , विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना जयश्री पुणेकर यांनी मनपा शाळेतील विद्यार्थ्यानी यशाची उत्तुंग भरारी घेऊन देशाचे नाव मोठे करावे असे विधान यावेळी केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष बापू घुले, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई पुणेकर (राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष) ,उत्तम फुलावरे सामाजिक कार्यकर्ते, तसेच शा.शि .संघटक अतुल माने आदी मान्यवर उपस्थित होते .मनपा प्राथमिक विद्यालय, उंड्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता .यामध्ये कबड्डी मोठा गट (मुली ) लंगडी मोठा गट ( मुले ) या संघानी प्रथम क्रमांक मिळवला तर डॉज बॉल ( मुले ) मोठा गट , लंगडी लहान गट, कबड्डी (मुले )मोठा गट या क्रीडा प्रकारांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला .या स्पर्धेमध्ये मनपा विद्यालय उंड्री या शाळेतील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .या सर्व विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे देऊन गुण गौरव करण्यात आला .तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा देखील गौरव करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका अलका ननावरे यांनी केले . सूत्रसंचालन उपशिक्षक नामदेव खांडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपशिक्षक गोरख थोरात यांनी केले .या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक नामदेव जगधने,अनभुले ,कंधारे ,दळवे ,.बांगर ,शेळके , प्रियांका लोंढे , .पवार हे उपस्थित होते…सर्व शिक्षकांनी अत्यंत मेहनतीने विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला होता.क्रीडा अधिकारी माने यांनी तसेच मान्यवरांनी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे खूप कौतुक केले..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!