Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीसासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या कोमल धुमाळ यांना न्याय कधी मिळणार ?

सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या कोमल धुमाळ यांना न्याय कधी मिळणार ?

दोन महिने होऊनही आरोपी मोकाट

अनिल चौधरी , पुणे

कोमल राजू धुमाळ वय (२०) वर्षे ह्या विवाहितेने सासर कडून वारंवार होणाऱ्या पैशाच्या जाचामुळे १९ मार्च रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिचे सासरे चंद्रकांत जाधव , सासू संगीता चंद्रकांत जाधव , पती प्रीतम चंद्रकांत जाधव रा, पाचगणी जि . सातारा यांच्याविरुद्ध मयताचे वडील राजू धुमाळ यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी कि , नवी खडकी येथील राजू धुमाळ यांची कनिष्ठ कन्या कोमल धुमाळ हिचा विवाह प्रीतम जाधव यांच्याशी मोठया मुलीच्या ओळखीने नोव्हेंबर २०२४ मध्ये नात्यातच करण्यात आला. विवाह झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी पुण्यात घर बांधण्यासाठी दहा लाख रुपये आणण्यासाठी सतत छळ सुरु केला . आपल्या वडिलांची परिस्थिती जेमतेम असून वडिलांनी विवाहाला भरपूर पैसे खर्च केले असून आत्ता वडिलांना त्रास देणे योग्य नाही असे ती वारंवार आपल्या पतीला सांगत होती. पण सततच्या पैशाच्या मागणीवरून कोमल मानसिक धक्यात होती. तसेच कोमलला पित्ताचा त्रास होता . यावरून सासरची मंडळी सतत टोमणे मारत होती. संक्रान्ती नंतर कोमलला दहा लाख रुपये आणण्यासाठी माहेरी हाकलून देण्यात आले. तिच्या वडिलांनी दोन ते तीन वेळा तिला सासरला म्हणजेच पाचगणी ला सोडण्याचा प्रयत्न केला पण सासरच्या लोकांनी तिला घरात घेतले नाही. यानंतर सुद्धा सासरच्या लोकांना वारंवार फोन करूनही ते काही ऐकत नव्हते. आपले सासरची मंडळी दहा लाख आणल्या शिवाय घरात घेणार नाही याची खात्री झाल्यावर कोमलने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली . याबाबत कोमलचे वडील राजू धुमाळ यांनी आरोपीविरोधात कलम ८५, १०८,३(५) प्रमाणे येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच जाधव कुटूंबाना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे अशी माहिती कोमलचे वडील राजू धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच आरोपींच्या विरोधात कठोरातील कठोर कारवाई करून त्यांचा जामीन रद्द करून त्वरित अटक करावी व खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तर आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला न्याय मिळत नाही अशी आमची भावना झाली आहे.सदर घटनेला दोन महिने होऊनही कठोर कारवाई झाली नाही.

याबाबत आम्ही जाधव कुटुंबाशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, आम्ही कुठलीही पैशाची मागणी केली नाही आम्ही तिला आमच्या मुलीप्रमणे समजत होतो . त्यांनी धुमाळ कुटुंबांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच आम्हाला न्यायालयाने जामीन दिलेला आहे.

आम्ही येरवडा पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता तो झाला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!