पुणे प्रतिनिधी ,
पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावच्या विविध मागण्यांसाठी पालिकेच्या शासन नियुक्त सदस्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन समाविष्ट गावांची समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांमध्ये अजूनही रस्ते, ड्रेनेज, पाणी, ओढे नाले तसेच नागरिकांवर लावण्यात आलेला कर हा देखील मोठा आहे या मोठ्या समस्या असून येथे त्वरित उपाययोजना करून कामे सुरु करून नागरिकांना दिलासा द्यावा अशा मागण्या शासन नियुक्त नगरसेवक राजेंद्र भिंताडे, वसंतराव कड,मच्छिंद्र दगडे, राकेश झांबरे यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या कडे केली. या संदर्भात पुढच्या आठवड्यात मीटिंग घेऊन कामे मार्गी लावू असे आश्वासन राम यांनी दिले.
वास्तविक महापालिका येथील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर गोळा करत असून त्या बदल्यात नागरिकांना सुविधा मिळत नाही अशा तक्रारी नागरिक करत आहे.
याप्रसंगी पुणे पालिका आयुक्त पदी नवल किशोर राम यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा श्री विठ्ठल रुख्मिणी मूर्ती, शाल श्रीफळ देऊन सत्कार राजेंद्र भिंताडे यांनी केला.