कोंढवा बुद्रुकमध्ये पालघण डोक्यात मारून जिवे मारण्याचा प्रयत्न

1030
भूषण गरुड,पुणे
कोंढवा बुद्रुकमध्ये रविवारी दि. 3 फेब्रुवारी रात्री एकच्या सुमारास शेखर लक्ष्मण अंबावले(वय 33, रा.लोअर इंदिरा नगर) याने त्याच्या मित्र सचिन जागडे(वय 28, रा.साहिल आनंद सोसायटी, कामठे पाटील नगर, कोंढवा बुद्रुक) यास त्याच्या घरी घेऊन जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेले शेखर लोखंडे(वय 26, रा.शेळके वस्ती, अप्पर इंदिरानगर), सुरेश बळीराम दयाळू(वय 24, रा.शेळके वस्ती, अप्पर इंदिरानगर) या दोघांनी सचिन जागडे याच्या डोक्यात पालघर मारून गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटने प्रकरणी, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेखर अंबावले यास त्याचा मित्र सचिन जागडे याने फोन करून निवांत हॉटेल ठिकाणी बोलावून घेतले. शेखर अंबावले बुलेट घेऊन भेटायला गेल्यावर सचिन जागडे याला घरी जायचे आहे. असे सांगितल्यावर ते दोघे सचिन जागडे यांच्या राहत्या घरी सोसायटीच्या गेट जवळ आले असता. त्याचवेळी पाठीमागून शेखर लोखंडे, सुरेश दयाळू दुचाकीवरून येऊन शेखर लोखंडे ने सचिन जागडे याची गळाभेट घेत “काय भाऊ काय करतोस असे म्हणत” अज्ञात कारणा वरून दोघांनी त्यांच्या जवळील पालघण ने सचिन जागडे याच्या डोक्यात मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. शेखर अंबावले याने सचिन जागडेस त्या दोघांच्या तावडीतून सोडविण्यासाठी गेला असता. त्या दोघांनी शीवीगाळी करत अंगावर पालघण उगारून तू मध्ये पडू नकोस नाहीतर तुला ही मारून टाकील अशी धमकी देत पळून गेले. शेखर आंबवले ने सचिन जागडे यास रुग्णालयात दाखल केले. परंतु पालघण घाव जोरात बसल्याने तो गंभीर रित्या जखमी झाल्याने त्याची प्रकृती नाजूक आहे.
या घटनेचा, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पुढील तपास करत आहेत.