निवडणूक खर्च निरीक्षक गुप्ता यांची मिडीया सेंटरला भेट

585

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

पुणे, दि.16 – बारामती लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक रोहित राज गुप्ता यांनी मिडीया सेंटर आणि (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्‍ड मॉनिटरींग कमिटी- एमसीएमसी) कक्षास भेट देऊन पहाणी केली. यावेळी एमसीएमसीच्‍या समन्‍वय अधिकारी नंदिनी आवडे, उप जिल्‍हाधिकारी सुधीर जोशी, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, दूरदर्शनचे कार्यक्रम प्रमुख संजय कर्णिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. योगेश बोराटे, टी.पी.शर्मा, एस.बी.निकम, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, शामल दीपक पोवार, पुणे मनपाचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे, अविनाश लोहर आदी उपस्थित होते.