कोरोनाग्रस्त रुग्णांना नूतन मराठी विद्यालय १९९२ बॅचच्या वर्गमित्रांचा मदतीचा हात…

1080

गणेश जाधव, मल्हार न्यूज, पुणे प्रतिनिधी :

कोरोनाग्रस्तांच्या रोजच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात ९ एप्रिलपर्यंत एकूण २७ कोरोनाचे रुग्ण मृत झाले. जिल्हा प्रशासनाकडून अलगिकरण आणि विलगिकरण कक्ष बनवण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आतापर्यंत १५७४कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे . आत्तापर्यंत ११० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशावेळी प्रशासनाकडून सामाजिक संस्थांना मदतीसाठी आवहान करण्यात येत आहे.

प्रशासनाच्या याच अवहानाला साद घालत नूतन मराठी विद्यालय, पुणे येथील १९९२च्या बॅच मधील सर्व वर्ग मित्रांनी एकत्र येऊन कोरोना विषाणूच्या लढ्यात समाजकार्य करण्याचे योजले. त्यानुसार १९९२ च्या बॅच मधील सर्व वर्ग मित्रांनी एकमेकांशी संपर्क करून काही समाजनिधी जमा केला व या समाजनिधीतून सर्व मित्रांनी १०० पीपीटी किट्स ,हॅन्ड ग्लोज ,मास्क ,सनीटायझर इ.शासनाच्या रुग्णालयाला वाटप करण्याचे ठरवले .

ठरल्याप्रमाणे त्यांनी जमलेल्या समाजनिधीतून पुण्यातील शासकीय रुग्णालय असलेले डॉ.नायडू रुग्णालय व ससून रुग्णालय येथे एकूण १०० पैकी प्रत्येकी ५० पीपीटी किट्स चे वाटप केले. दोन्ही रुग्णालयातर्फ सदर किट्सच्या वाहतुकीकरिता विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती.

डॉ. नायडू रुग्णालयातर्फे श्री. काशीद व श्री. भापकर तसेच ससून रुग्णालयातर्फे श्री.सुरवसे व श्री .गायकवाड यांनी नूतन मराठी विद्यालय १९९२बॅचचे विद्यार्थी असलेले दर्शन किराड, शैलेंद्र खरे ,अमित धारप ,नचिकेत शिरगावकर व नितीन जोशी यांस कडून सदर किट्स स्वीकारले.

डॉ.नायडू रुग्णालय व ससून रुग्णालयात तर्फे सदर सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले जात आहे .आज आपत्कालीन परिस्थितीत तुमच्यासारख्या वर्गमित्रांनी एकत्रित येऊन ज्याप्रकारे १०० पीपीटी किट्सचे वाटप केलं त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना याचा निश्चितच फायदा होणार आहे ,असे मत रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केले व आभारही मानले.असाच पुढाकार घेऊन वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी पुढे यावे असे देखील सांगण्यात आले.. सदरच्या कार्यातून शाळेने केलेले सामाजिक संस्कार व आपुलकीची भावना या समाजकार्यातून पाहायला मिळाली.