अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

1007

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

१६वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या अनिल आडसूळ रा.बारलोणी (कुर्डूवाडी) ता.माढा,जि.सोलापूर याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात भां.द.वि.३७६(३),५०६,बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ चे अधिनियम ३,६,१७ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अजून अटक झालेली नाही.यासंदर्भात १६ वर्षीय मुलीने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

  याबाबत चिंचवड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक ए.एम.जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार ३मे रोजी रात्री ८वा ९ मिनिटांच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरामध्ये एकटीच असताना प्रवेश केला. तिला लग्नाचे आमिष दाखवून तू माझ्याशी लग्न कर म्हणून धमकी देऊन घराचा दरवाजा बंद केला. जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शाररीक संबंध ठेवले. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी देऊन तो पसार झाला. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.