शैलेंद्र चौधरी
कोल्हापूर शिरोली मदरसा इथे गेले पंधरा दिवस राहीलेल्या सुमारे तीनशे पुरग्रस्त पुरुष व महीलांची मदरसातील लोकांनी कुंटूबा प्रमाणे काळजी घेतली परत घरी जाताना पुरग्रस्त गहीवरले त्यातील मुली आणि महिलांनी मदरशामधील बांधवांना राखी बांधून हा सण अविस्मरणीय बनवला. मुस्लीम बांधवांनी आमची घेतलेली काळजी आम्ही जन्मभर विसरणार नाही असे भावूक उद्गगार यावेळी महीलांनी काढले.