महापुरुषांची विटंबना करणं ही एक विकृती; सनी निम्हण

619

पुणे प्रतिनिधी,

दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर असलेल्या विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्यास कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी विंग असणाऱ्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या गुंडांनी गुरूवारी काळे फासले असल्याची घटना घडली आहे. एनएसयूआयचा दिल्ली प्रदेशाध्यक्ष असलेल्या अक्षय लकराने हे संतापजनक कृत्य केले आहे. एका बाजूला सोशल मिडीयावर या घटनेचे तीव्र पडसाद पडत असताना महाराष्ट्रातील बहुतांश नेत्यांनी या प्रकरणावर मौन बाळगले.

या प्रकरणासंबंधी राष्ट्रीय मानव अधिकार आणि अपराध नियंत्रण संघाचे अध्यक्ष सनी निम्हण
यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले, मी या घटनेचा 100 टक्के निषेधच करतो. कोणत्याही महापुरुषांची विटंबना हा आपल्या इतिहासाचा अपमान आहे,.आणि महापुरुषांची विटंबना करणे ही प्रकारची एक विकृती आहे. कॉंग्रेस चा सर्वत्र जो पराभव होत चाललेला आहे त्याच निराश पणाची ही विकृती आहे.

दरम्यान ते पुढे म्हणाले,ज्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करतो. प्रत्येक महापुरुषांचे काम हे थोर आहे. स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये त्यांनी काय काम केले आहे आणि काय कष्ट भोगले आहेत. हे कॉंग्रेस वाल्यांना कळणार नाही असे ते म्हणाले .या घटनेचा सर्वसामान्य जनता आणि देशप्रेमी नागरिक या मुद्द्यावर सोशल मिडियावर संताप व्यक्त करीत आहेत. या भयंकर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून एनएसयूआयच्या लाकरा आणि पदाधिकाऱयांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे