हातात कोयता घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद

2796

भूषण गरुड, कोंढवा

कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत साईनगर येथे हातात कोयता घेऊन रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना “मै यहाका भाई हू ! मेरे नाद कोई लग्ना नही! नही तो मै किसी को नही छोडूंगा !” असे मोठ्याने ओरडत परिसरात दहशत माजवणारा चांद फक्रुद्दीन शेख (वय 20, राहणार. दुर्गामाता गार्डन जवळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) यास कोंढवा पोलिसांनी जेरबंद करत पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2019 रोजी रात्री 10:30 वा सुमारास पेट्रोलिंग करत असताना पुरुषोत्तम सोसायटी क्रांती चौक ते अप्पर डेपो रोडवर, साईनगर, कोंढवा बुद्रुक याठिकाणी चांद फक्रुद्दीन शेख हा इसम हातात कोयता घेऊन रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍या लोकांना “मै यहाका भाई हू ! मेरे नाद कोई लग्ना नही ! नही तो मै किसको छोडूंगा नही !” असे मोठ्याने ओरडत परिसरात दहशत माजवत असताना दिसताच त्यास शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडून लोखंडी कोयता जप्त केला. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई आनंद धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीची दखल घेत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कामगिरी, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक वाडकर, देवकाते, सहाय्यक पोलीस फौजदार शेख, पोलीस नाईक कौस्तुभ जाधव, पोलीस शिपाई आनंद धनगर यांनी केली. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वाळके करत आहेत.