शैलेंद्र चौधरी नंदुरबार
हतनूर धरण पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन 26 ऑगस्ट 2019 रोजी पहाटे 1 वाजता धरणाचे सर्व 36 गेट पुर्ण उघडून सुमारे 1 लाख 92 हजार क्युसेक्स प्रवाह तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळे सारंगखेडा बॅरेजचे 15 गेट पुर्ण उघडण्यात आले असून सुमारे 1 लाख 28 हजार क्युसेक्स,तर प्रकाशा बॅरेजचे 8 गेट पुर्ण उघडण्यात येऊन 1 लाख 44 हजार क्युसेक्स पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात आले आहे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे व नदी काठावार थांबू नये,असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
—–
पूरग्रस्तांना जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत अनेक नागरिक आपले योगदान देत आहेत. द सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्रिज ट्रस्ट नंदुरबार आणि सुवार्ता अलायन्स चर्च नंदुरबारतर्फे प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला डॉ.राजेश वळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ह दोन्ही धनादेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांचेकडे सुर्पूर्द केले रनाळे येथील जि.प.कल्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी गावात मदत फेरी काढून त्यात एकत्रित झालेल्या3540रुपयांचा धनादेश,तर संतोष माळी यांनी 20हजार380रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला मायाबाई मराठे यांनीदेखील पूरग्रस्तांसाठी10 हजाराचा धनादेश दिला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीस आलेल्या पुरामुळे या दोन्ही जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात जिवित व वित्तहानी झाली होती. त्यानंतर पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनीदेखील पूरग्रस्तांना मदतीसाठी आपले योगदान दिले आहे नागरिकांना पूरग्रस्तांना सहाय्य करावयाचे असल्यास त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेत द्यावा,असे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी केले आहे.
——
दि 3 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडुन सोडवणुक करण्यासाठी लोकशाही दिन हा जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी आयोजित केला जातो सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली रंगावली सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे दि3सप्टेंबर रोजी दुपारी1.00 वाजता आयोजित करण्यात येईल संबंधितांनी याची नोंद घ्यावी,निवासीउपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी कळविले आहे.
0 0 0 0 0 0 0 0 0 0
मागासवर्ग आयोगाकडे हरकती सादर करण्याबाबत आवाहन
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांचेकडे ठेलारी (भटक्या जमातीचा-ब)या जमातीचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या भटक्या जमातीच्या अ.क्र.29 धनगरची तत्सम म्हणून(भटक्या जमाती-क)मध्ये समावेश करण्याबाबत निवेदन प्राप्त झाले आहे ठेलारी या जमातीच्या मागणी संदर्भात संस्था,संघटना अथवा व्यक्तींना निवेदन,हरकती व सूचना लेखी स्वरुपात मांडावयाच्या असल्यास त्यांनी दि 12 सप्टेंबर 2019 पर्यंत आयोगाच्या कार्यालयास कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात,असे आयोगाचे सदस्य सचिव डी.डी.देशमुख यांनी कळविले आहे आयोगाच्या कार्यालयाचा पत्ता सदस्य सचिव,महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग,नविन प्रशासकीय इमारत रुम न.309,तिसरा मजला,विधान भवन समोर पुणे-411001असून ई-मेल msbccpune@gmail.com आहे.
0 0 0 0 0 0 0 0
पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यासाठी दाखला आवश्यक
राज्यातील सांगली, कोल्हापूर, सातारा व इतर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे बाधित पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यापूर्वी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम1950च्या कलम41 अ नुसार विहित नमुन्यात अर्ज धर्मादाय उपायुक्त किंवा सहायक धर्मादाय आयुक्त यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे मदत गोळा करण्यासाठी अर्ज केलेल्या मंडळांना किंवा संस्थांना चौकशीनंतर अटींच्या अधीन राहून दाखला देण्यात येईल पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गोळा केलेल्या वस्तू किंवा रकमेचा योग्य उपयोग गरजूंना होण्यासाठी मंडळांनी वस्तू व रकमेचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत किंवा त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्याच्या समन्वयाने किंवा निरीक्षणाखाली करावे संबंधित मंडळांनी पुर्वसुचना देताना सोबत सर्व सदस्यांच्या सहीचा हस्तलिखित ठराव आणि पदाधिकारी व सदस्यांची ओळखपत्राची प्रत सोबत जोडावी पुर्वसुचना प्राप्त झाल्यानंतर15दिवसाच्या आत दाखला देण्यात येईल मदत गोळा करण्यात फसवणूक अथवा अपव्यय झाल्याचे निदर्शनास आल्यास धर्मादाय उपायुक्त किंवा सहायक धर्मादाय आयुक्त मदत अथवा रक्कम गोळा न करण्याचे आदेश देतील तसेच हिशोबपत्रके सादर करून उर्वरित रक्कम पीटीए फंडात जमा करण्याचे आदेशित करतील,असे धर्मादाय आयुक्त संजय मेहरे यांनी कळविले आहे.
—————-
जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाई
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण यांनी तापी नदीपात्रा
शेजारील गावात अवैध वाळू आणि रेतीच्या उत्खननाविरोधात कारवाई केली आहे श्रीमती चव्हाण यांनी दि23ऑगस्ट रोजी पाहणी केली असता शहादा तालुक्यातील मौजे टेंभे येथे अवैधरित्या वाळू/रेतीची साठवणूक आढळून आली. त्यानुसार मंडळ अधिकारी सारंगखेडा व तलाठी टेंभे यांना बोलावून पंचनामा करण्यात आला पंचनाम्यानुसार अंदाजे 997ब्रास वाळूची साठवणूक केल्याचे निदर्शनास आले सदर वाळू/रेतीसाठा जप्त करण्याबाबत तहसीलदार शहादा यांना कळविण्यात आले असून उपविभागीय अधिकारी शहादा यांना साठ्याचा जाहीर लिलाव करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड शासकीय दौऱ्यावरून परतत असताना दि25ऑगस्ट रोजी नंदुरबार शहराजवळ वाळू वाहतूक करणारे वाहन क्रमांक एमएच-39एडी0350आढळूल आले वाहन चालकाजवळ वाहू वाहतूक परवाना आढळून न आल्याने सदर वाहन जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जमा करण्यात आले आहे या वाहनावर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे,असे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी कळविले आहे.