नवी मुंबई पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम

1340

पनवेल, गिरीश भोपी,

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त आणि उपायुक्त यांनी  आयुक्तालयात अंमली पदार्थ विरोधी कक्षातर्फे विद्यार्थी व नागरिकांमध्ये अंमली पदार्थांसारख्या घातक व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या व  नागरिकांच्या सक्रिय सहभागातून मोहीम राबविण्यात आली . त्याकरिता दिनांक २९/०८/२०१९ रोजी ११:०० ते१४:०० वा दरम्यान नवी मुंबई कॉलेज असोसिअशन,आशा की किरण क्राईम ब्रँच नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पिल्लई इन्स्टिट्यूट ऑफ managment अँड रिसर्च नवीन पनवेल येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रम वेळी पिल्लई कॉलेज विसपुते कॉलेज ब्राँझ कॉलेज पिल्लई रसायनी CKT कॉलेज KLC कॉलेज या सहा कॉलेजचे सुमारे 350 ते 400 विध्यार्थी तसेच शिक्षक वर्ग हजर होते

विद्यार्थी व नागरिकांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती तसेच कॉलेजचे विध्यार्थी हे अंमली पदार्थासारख्या घातक व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी तसेच त्यांचे पुढील आयुष्य सुंदर , सुबक व निरोगी बनविण्यासाठी त्यांना मा. सहा पोलीस आयुक्त सो गुन्ह यांनी योग्य ते मार्गदर्शन करून संबोधित आले. त्यावेळी आशा की किरण या संस्थेचे अध्यक्ष बशीर कुरेशी , एन एस एस चे प्राचार्य  शबाब रिझवी सकाळ पेपर चे अतुल शेंगोकर व इतर मान्यवर हे हजर होते.