पुणे प्रतिनिधी,
पूरग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी संस्थानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी केले.
सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे या जिल्हयातील नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनामार्फत त्यांना वेगवेगळया माध्यमातून मदत देण्यात येत आहे. शासनातर्फे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारी नोकर सहकारी ग्राहक वस्तू भांडार (म),पुणे मार्फत पूरग्रस्तांच्या मदतीकरीता 51 हजाराचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, सचिव अशोक शिंदे, संचालक अनिल वाघमारे व संजय वाघमारे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांच्याकडे सुपूर्द केला.