शिरीषकुमार मित्र मंडळाची पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपतीची परंपरा कायम

615

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

निसर्गाचा समतोल मानवच कारणीभूत आहे भविष्यातील संभाव्य धोके पाहता पर्यावरणपूरक गणेशोत्सव काळाची नव्हे तर आजची गरज आहे नंदनगरीतील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाने पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपतीची परंपरा कायम राखली आहे तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे शिक्षकांना वृक्ष रोप भेट देऊन सन्मान करीत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे. शिरीष कुमार मंडळाचे कार्य अभिमानास्पद असून यातून सामाजिक प्रेरणा मिळते असे प्रतिपादन शहादा नगरपालिकेच्या भाजपा युवा नगरसेविका रिमा विनायक पवार यांनी केले नंदुरबार येथील शहीद शिरीषकुमार मित्र
मंडळातर्फे गणेशोत्सव आणि शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी नगरसेविका रिमा पवार,उत्कृष्ट रांगोळी प्रशिक्षिका भारती पवार,पुनम भावसार उपस्थित होत्या नगरसेविका रिमा पवार यांनी पर्यावरणपूरक श्री गणरायाची आरती केली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित शिक्षकांना वृक्षरोप भेट देऊन गौरविण्यात आले यात राजेश आर शहा(पर्यवेक्षक, हायस्कूल नंदुरबार)दासू सोनू कोकणी(सावित्रीबाई फुले न. प. शाळा नंदुरबार)कैलास ताराचंद ढोले(जि.प.शाळा पिंपळे तालुका नवापूर)राजू चंदू चौधरी (जि.प.शाळा कळमसरे तालुका तळोदा)अनिल शेनपडु गांगुर्डे (जि.प.शाळा वडसत्रा तालुका नवापूर)प्रा.एकनाथ जी. हिरणवाळे(जी.टी.पाटील महाविद्यालय नंदुरबार)सौ.पूजा एकनाथ हिरणवाळे(पी.के. पाटील विद्यालय नंदुरबार)या शिक्षक-प्राध्यापक वृंदाचा सन्मान करण्यात आला या सत्काराने सर्वच शिक्षक भारावून गेले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना हिरणवाळे तर आभार याचिका ढोले या विद्यार्थिनींनी मानले कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे,डॉ. गणेश ढोले,डॉ.भूषण पालकडे, संभाजी हिरणवाळे,साहूल कुशवाह,गोपाळ हिरणवाळे, विशाल हिरणवाळे,संजय चौधरी,आणि पदाधिकार्‍यांनी केले कार्यक्रमास बालवीर चौक, नवी भोई गल्ली,गवळीवाडा, कोकणी हिल परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदुरबार येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षकांना वृक्षरोप भेट देऊन सन्मानित करताना शहादा येथील नगरसेविका रीमा पवार सोबत भारती पवार,पूनम भावसार,तसेच शिक्षक – शिक्षिका उपस्थित होते.