शैलेंद्र चौधरी नंदुरबार
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील जसाने गावासाठी आज ऐतिहासिक दिवस असून गेले अनेक वर्षे तापी नदीला पूर आल्यानंतर या गावातील लोकांना भीतीने राहावे लागत होते या गावासाठी विरदेल रस्त्यावर नवीन गाव बसविण्यात येऊन जसाने गावचे पुनर्वसन करणार असून या कामाचे भूमिपूजन ना जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी धुळे जिल्हाधिकारी गंगाथरण डी,जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम,प्रांत अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार सुदाम महाजन, साहेबराव सोनवणे,आदी मान्यवर उपस्थित होते
एखादया गावाचे पुर्नवसन म्हणजे त्या गावासाठी मोठा ऐतिहासिक दिवस असतो त्यासाठी गावाने देखील आपले गाव आदर्श वसावे याकरिता सहकार्य करणे गरजेचे असून जसाने गावातील त्याचा उत्कृष्ट असा आराखडा तयार करण्यात आला आहे त्यात शासकीय इमारती,खुल्या जागा अश्या सर्व प्रकारच्या सोयी करून गावाचा आराखडा तयार करण्यात आला आहे प्रत्येक प्रत्येक पुनर्वसित जागा ही 1500 चौरस फुटाची आहे यात अतिशय सुंदर असे घर बांधले जाणार आहे पण तरीही पुनर्वसित ग्रामस्थांनी घरे बांधताना शासकिय जागेत न बांधता दिलेल्या जागेतच अतिशय शिस्तीत घरे बांधली गेली पाहिजेत,जे गावातील प्रमुख तीन रस्ते आहेत त्यांना काँक्रीटीकरणासाठी विशेष निधी देणार असून गाव
दरवाजासह इतर कामे देखील आगामी काळात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे ना जयकुमार रावल यांनी सांगितले