यशश्री ग्रुपचा सामान्यांना परवडेल असा गृहप्रकल्प

630

सागर बोदगिरे, पुणे

यशश्री ग्रूपतर्फे पुण्यापासून दोन तासाच्या अंतरावर असलेल्या मोशी येथील दुदुळगाव परिसरात ‘मंगलम होम्स’ हा १ आणि २ बीएचके घरांचा प्रकल्प राबवण्यात आला आहे. या २८८ घरांच्या प्रकल्पाचा शुभारंभ ६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता मोशी – आळंदी येथे होणार असून शुभारंभाचे उदघाटन मराठी अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती सुभाष साकोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परिषदेला प्रकल्पाचे भागीदार संजय भिसे, अभिषेक भिसे, चेतन कुंजीर आणि मार्केटिंग हेड आकाश देसाई उपस्थित होते.

साकोरे म्हणाले, यशश्री ग्रुपने यापूर्वी चाकण, तळेगाव प्राधिकरण आणि पुनावळे येथे सहा भव्य प्रकल्प साकारले आहेत. त्यामधील चार प्रकल्पांचा ताबा ग्राहकांना देण्यात आला असून दोन प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. मंगलम होम्सचे प्रमुख उद्दिष्ट या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडतील अशी घरे देणे हे आहे. या प्रकल्पांतर्गत आम्ही प्रत्येक ग्राहकासाठी मल्टिपर्पज हॉल, जिम, पटांगण, पार्टी लॉन, स्पोर्ट क्लब, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, ज्येष्ठांसाठी कोर्ट, आऊटडोअर योगा, प्लाश पूल आणि प्रशस्त पार्किंग अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देणार आहोत.

याशिवाय मंगलम होम्स येथे बजेटमध्ये प्रशस्त घर आणि घराच्या जवळच दुकाने, लहान मुलांसाठी शैक्षणिक सुविधा आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी मॉल्स आहेत. कॉमन बाथरूमसाठी सोलर सिस्टिम असून सर्वसामान्यांना आवश्यक असणाऱ्या इतर गरजांची पूर्तता येथे करण्यात आली आहे. यशश्री ग्रुपचे आरंभ आणि ऑस्टिन प्लाझा हे प्रकल्प पूर्ण झाले असून बेलेंझा, ऑस्टिन पार्क, पॅनॅश, गोल्डन पाल्म्स हे प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. अशा पद्धतीने यशश्री ग्रुपने यापूर्वी एकूण ७१० फ्लॅट्सचे प्रकल्प उभारून या क्षेत्रात ग्राहाकांची पसंती मिळवली असून सद्यस्थितीतला २८८ फ्लॅट्सच्या प्रकल्पाकडे वाटचाल केली आहे. यामध्ये १९२ फ्लॅट्स हे १ बीएचके तर ९६ फ्लॅट्स २ बीएचके आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत मंगलम होम्समध्ये पंचवीसहून अधिक ग्राहकांनी बुकिंग केले असून अजूनही बुकिंग चालूच आहेत. असेही साकोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.