मतदार संघाचा विकास करून दाखवू ; वसंत मोरे

955

कोंढवा प्रतिनिधी,

हडपसर विधानसभा मतदार संघाचा आपण कात्रज प्रमाणे विकास करून दाखवू तसेच मी ही एक शिवसैनिक होतो, त्यामुळे हडपसर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी, नेत्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन हडपसर विधानसभा मतदार संघाचे मनसेचे अधिकृत वसंत मोरे यांनी कोंढव्यातील सर्वे नंबर 354 मध्ये झालेल्या कोपरा सभेत केले.
भाजपाने शिवसेनेला पुण्यात एक ही जागा न दिल्याने अन्याय केला आहे, त्यामुळे शिवसैनिकांनी मला मतदान करून एक कार्यक्षम नगरसेवकाला आमदार बनविण्याची संधी द्यावी. आपण आमदार झाल्यावर हडपसर विधानसभा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकू असेही मोरे म्हणाले. महाराष्ट्रात आपला मतदार संघ एक नंबरचा विकासाभूमुक बनवून दाखवू तसेच विकास काय असतो तो विरोधी पक्षाला आपण दाखवून देऊ . यावेळी वसंत मोरे यांनी विरोधी पक्षाच्या आमदरावर टीका केली. याप्रसंगी नगरसेवक साईनाथ बाबर तसेच मनसेचे पदाधिकारीआणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.