Wednesday, February 19, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेनुकसानीचे पंचनामे तात्‍काळ करण्‍याचे आदेश    

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेनुकसानीचे पंचनामे तात्‍काळ करण्‍याचे आदेश    

 पुणे प्रतिनिधी

 पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळेग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती,जिरायती, हंगामी पिके, तसेचफळबागांना मोठा फटका बसला असून मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे.तसेच शहरी भागामध्ये घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे 4 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.संबंधित तालुकयाचे तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि तालुकाकृषी अधिकारी यांनी संयुक्‍तपणे पंचनामे करावे, असेही जिल्‍हाधिकारीराम यांनी स्‍पष्‍ट केले.         जिल्हाप्रशासनाकडून आपदग्रस्तांना तातडीने करावयाची मदत देण्यात आली आहे.  महानगरपालिका तसेच झोपडपट्टी पुनर्वसनप्राधिकरणामार्फत देखील पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याविषयी तात्काळ कार्यवाही करुन प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले.                         राज्यातीलअतिवृष्टी व पुरपस्थितीसंदर्भात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही  व्हिडीओ कॉन्फरसींगद्वारे संवाद साधला.  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हयात झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे बाधीत झालेल्या कुटूंबांना देण्यात येणा-यामदतीबाबत व त्यांच्या पुनर्वसनाबाबत तसेच ग्रामीण भागातील पिकांचे पंचनामे करुनतात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. या यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या तपशीलावरुन संबंधितांना नुकसान भरपाई मिळण्याकरीता जिल्हा प्रशासनाकडून राज्यशासनाकडे  प्रस्तावपाठविण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारीडॉ.जयश्री कटारे यांनी दिली.  नुकसानीबाबत काही शंका असल्‍यास टोल फ्री नंबर 1077 आणि पुणे येथील आपत्‍ती नियंत्रण कक्षाचा क्रमांक 02026123371 येथे संपर्क करावा, असे आवाहनही करण्‍यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!