Friday, March 21, 2025
Google search engine

फत्तेशिकस्त

पुणे प्रतिनिधी,

मराठेशाहीचा इतिहास हा जसा संस्कृती,परंपरांचा,अभिमानाचा आहे तसाच तो शूरांचा, शौर्याचा आणि त्यांच्या बेधडक साहसाचा सुद्धा आहे. शत्रूंच्या छातीत धडकी भरविणाऱ्या मराठ्यांचा गौरवशाली इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने जगभर पोहचला. युद्धनीती अन् रणनीती हीच खरी महाराजांची ओळख. अटकेपार झेंडा फडकवीत मराठ्यांनी हा इतिहास जिवंत ठेवला नव्हे इथल्या प्रत्येकाच्या हृदयात रुजवला हाच देदीप्यमान इतिहास आता दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून दुमदुमणार आहे. ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गनिमी कावा हे युद्धतंत्र शिवाजी महाराजांनी जगाला दिले. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना हाणून पाडत. शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार ‘फत्तेशिकस्त’’ मधून अनुभवता येणार आहे.

अफझलखान वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. सिद्धी जौहरच्या वेढ्यातून ते बाहेर पडण्यात यशस्वी झाले, पण शाहिस्तेखानाचे संकट उभे राहिले. शाहिस्तेखानाच्या धुमाकूळात स्वराज्यातील रयत भरडून निघत होती. महाराजांनी आपल्या विश्वासू मंडळींबरोबर विचारविनिमय करून योजना पक्की केली. रामनवमीच्या आदल्या दिवशी अर्थात चैत्र शुद्ध अष्टमीला लालमहालावर हल्ला करण्याचे निश्चित ठरले. यासाठी शिवरायांनी शॉक ट्रीटमेंटचा वापर करायचा विचार केला आणि त्याबरहुकुम योजना बनवली. १ लाख मुघल सैन्याविरोधात आपले ९० विश्वासू शिलेदार घेवून महराजांनी जगाच्या इतिहासातील उत्कृष्ट लष्करी कारवाई फत्ते केली त्याचा रोमांचकारी अनुभव ‘फत्तेशिकस्त चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके, सायली जोशी जाधव, अदिती भास्कर, सचिन गवळी, गणेश तिडके, राजेश अहेर, अक्षय शिंदे यासोबत हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात आहे.

छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि.स खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून रंगभूषा सानिका गाडगीळ यांची आहे. ध्व्नीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. साहस दृश्ये बब्बू खन्ना तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. व्ही. एफ.एक्स इल्युजन ईथिरीअल स्टुडियोज यांचे आहे. कार्यकारी निर्माता उत्कर्ष जाधव आहेत. अजय आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.

शिवरायांची युद्धनीती ही आजसुद्धा प्रेरणा देणारी आहे. नुकत्याच घडलेल्या सर्जिकल स्ट्राइकची प्रेरणा लालमहालावरील यशस्वी आक्रमणाच्या घटनेत दडली आहे.

‘फत्तेशिकस्त’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!