पुणे
अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या मिसेस इंडिया २०२० या स्पर्धेमध्ये सुचित्रा खरवंदीकर यांना उत्कृष्ट मैत्री पूर्ण व्यक्तिमत्त्व या अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. पूर्ण भारतभरातून ४०, ००० महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपला सहभाग नोंदवला होता. त्यातून त्यांनी १,००० महिलांची निवड केली होती. यावर्षी प्रथमच मिसेस इंडिया २०२० या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट मैत्री पूर्ण व्यक्तिमत्त्व पुरस्कार देण्यात आला.
सुचित्रा यांनी लहान असतांना स्वरूप संपत मिस इंडिया झाल्याचे ऐकले होते तेव्हा त्यांना मिस इंडिया म्हणजे काय आहे ते समजले नाही. परंतु मिस इंडिया हा शब्द त्यांच्या डोक्यात फिट बसला त्यानंतर अनेकदा त्याबद्दल त्यांनी ऐकले आणि त्याबद्दलचे आकर्षण वाढत गेले. मग ऐश्वर्या रॉय, सुश्मिता सेन, प्रियांका चोप्रा,डायना हेडन अशी मिस इंडियाची लिस्ट वाढत गेली आणि तेव्हा समजले की ही संपुर्ण व्यक्तिमत्त्व स्पर्धा आहे.
यावेळी बोलताना सुचित्रा खरवंडीकर म्हणाल्या की, पुण्यामधून मी एकटीच स्पर्धक होते परंतू या स्पर्धेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर मिसेस अर्थ प्रियांका खुराणा गोयल तसेच इतर स्पर्धक मैत्रिणींनी मला कधीच मी दिव्यांग आहे हे जाणवू दिले नाही. स्पर्धे दरम्यान जो आदर, प्रेम आणि आपलेपणा त्यांनी मला दिला आहे तो माझ्यासाठी खूप अनमोल आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, तुमचा जर स्वतावर विश्वास असेल तर तुमच प्रत्येक स्वप्न पूर्ण होते त्यामुळे कायम स्वतःवर विश्वास ठेवा.