रोटरीच्या वतीने माऊ गावातील बंधारा दुरूस्ती व जलपूजन संपन्न.

551

रोटरी क्लब व पंचायत समिति मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर पद्धतीच्या बांधार्‍याचे दुरूस्ती व जलपूजन करण्यात आले.साठलेला गाळ काढून व ढासळलेला कोल्हापूर बंधारा त्याला नवीन दरवाजे बसविण्यात आले.यात चार रोटरी क्लबचा सहभाग होता.या अडलेल्या पाण्यामुळे तीन खेड्यांचा पिण्याच्या पाण्याचा उन्हाळ्यातील प्रश्न सुटला आहे.तसेच त्यांना अजून एक पीक यावर घेता येणार आहे.त्यामुळे त्यांचा आर्थिक स्तरही उंचवणार आहे.या कामात सरकारी व जिल्हा परिषदचे इंजिनियर यांचा व रोटरी इंजिनियर यांचा मोलाचा वाटा होता.या प्रकल्पाचे नेतृत्व जलपरी म्हणून संबोधण्यात येणार्‍या रो.डॉ.मीनाक्षी बोराटे यांनी केले.याप्रसंगी भावी प्रांतपाल रो.पंकज शहा,डॉ.मीनाक्षी बोराटे,याप्रसंगी रो.अतुल पाटील(इंजिनियर),गुलाब म्हाळस्कर (पंचायत समिति सदस्य),शांताराम कदम(पं.स.समिति सदस्य),शरद माळी(गटविकास अधिकारी),गौरव बोरकर(उपविभागीय जलसंधारण अधिकारी),गुलाब गभाले(सरपंच),जिजाबाई जगनाडे(सरपंच)राजू सांडभोर(शिवसेना ता.प्रमुख),आदी मान्यवरांच्या बरोबरच ग्रामस्थ उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना मीनाक्षी बोराटे यांनी या प्रकल्पास सुमारे २६ लाख खर्च आला असून सुमारे ४००० ग्रामस्थांना याचा लाभ होईल असे संगितले.पंकज शहा यांनी बोलताना अधिकारी,रोटरी सदस्य व ग्रामस्थ यांची पाणी वापर संस्था स्थापून या पाण्याचा योग्य तो विनियोग व ताळेबंद ठेवावा अशी सूचना केली.