नारीशक्तीचा सन्मान करीत ब्रम्हमुहूर्त योग केंद्राचा महिला दिन उत्साहात साजरा

1201

पुणे प्रतिनिधी ,

नारीशक्तीचा सन्मान करीत ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्र यांच्या वतीने यातील योग साधकांनी गुरुदेव श्री दीपक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला.

   योग साधनेत  सहभागी झालेल्या महिलांच्या पतींनी  आप आपल्या  पत्नीला औक्षण करून त्यांना नमस्कार करून एक प्रकारे उचित असाच महिलांचा सन्मान केला. अशा प्रकारचा अनोखा उपक्रम पहिल्यांदाच होत असल्याने पुरुषांनी योग गुरूंचे आभार मानले. योग गुरू दीपक महाराज यांनी गुरुमाऊली वैशाली मॅडम यांना औक्षण करून त्यांना नमस्कार केला तसेच इतर महिला साधकांना देखील औक्षण करून त्यांना नमस्कार करून त्यांना शुभाशीर्वाद दिले, असा न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम यावेळी पार पडला.

यावेळी बोलताना गुरुदेव दीपक महाराज यांनी महिला दिन का व कशासाठी साजरा केला जातो याबद्दल माहिती दिली. प्रत्येक घरात साडेतीन शक्तीपीठे आहेत आई, बहीण, बायको, व आर्धे शक्तीपीठ मुलगी यांना जपा, पूजा करा कारण यांच्या  जवळ आहे  संस्कृती, सण, उत्सव, आणि परंपरा त्यामुळेच आपले घर समृद्ध होते. तर महिलांचा सन्मान केल्यामुळे काही पतींना आपण आपल्या आईचा , बहिणीचा तसेच मुलीचा योग्य सन्मान करत असल्याचा अनुभव यावेळी सांगितला.

याप्रसंगी सुधीर गरुड, औटी सर, दीपक गोरे, शशिकांत आनंदास, अश्विनी पासलकर, ममता चोरडिया, विजय लोणकर अनुजा लोणकर तसेच नागरिक साधक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.