Wednesday, February 19, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेखाकी वर्दीतील अशीही सामाजिक बांधिलकी

खाकी वर्दीतील अशीही सामाजिक बांधिलकी

पुणे प्रतिनिधी,

आज दुपारी पुणे कँम्प भागातील सेंट व्हीन्सेंट शाळेजवळ एक रिक्षाचालक रिक्षातच बेशुध्द पडून मरण पावल्याचे आढळले.लष्कर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता त्यांची पत्नी व लहान मुले वगळता इतर कोणीही नव्हते. सदर रिक्षाचालकास पुढील वैद्यकीय कार्यवाहीसाठी ससून रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी एका सामाजिक संस्थेची अँम्ब्यूलन्स मिळवली परंतु त्यावर चालक नसल्याने चारबावडी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कुलाळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः अँम्ब्यूलन्स चालवून सदर रिक्षाचालकास ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांच्या सोबत पोलीस हवालदार एकनाथ एक्के, पोलीस शिपाई जगदाळे कर्तव्यावर होते.
         यापूर्वीही पोलीस उपनिरीक्षक कुलाळ यांनी अनेकदा आपल्यातील सामाजिक बांधिलकी जपली होती. आज स्वतः अँम्ब्यूलन्सचे चालक होऊन त्यांनी खाकी वर्दीतील माणूसपणाचे दर्शन घडविल्याबद्दल कँम्प भागातील सामाजिक संघटना व नागरिकांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!