लोणीकंद पोलीस स्टेशनला (ISO) आय एस ओ मानांकन 

639

नाथाभाऊ ऊंद्रे, मांजरी
लोणीकंद पोलीस स्टेशन सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी कोरोना कलावधीत उल्लेखनीय काम केल्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालक मंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आज स्वतंत्र दिना निमित्त पुणे येथे एका कार्यक्रमात लोणीकंद वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी मानांकन स्विकारले.प्रसंगी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील सह अनेक वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कोरोना काळात कायदा व सुव्यवस्था राखताना जिवाची पर्वा न करता पोलीस स्टेशन मधील प्रत्येक कर्मचारी, अधिकारी यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शन खाली प्रमाणीक काम केल्या बद्दल लोणीकंद पोलीस स्टेशनला आय एस ओ (ISO) मिळाल्याने लोणीकंद पोलीस अजुन जोमाने काम करण्याची ताकद मिळाल्याचे पोलीस निरीक्षक मानकर यांनी सांगितले.