पुणे प्रतिनिधी,
कोरोना या महामारीमुळे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे हाल होत आहेत. कोरोनामुळे अनेकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यापैकी एक ठिकाण म्हणजे स्वामी भक्तांचे श्रध्दास्थान असलेले अक्कलकोट. कोरोना विषाणुच्या आपत्तीमुळे अक्कलकोट येथील ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ’ या ट्रस्टचे स्वामीभक्तांसाठी अन्नदानाचे स्वामीकार्य १५ मार्चपासून थांबले आहे. स्वामीकार्य अखंडितपणे चालू राहण्यासाठी समाजसेवक, एन.एम. एंटरप्रायझेसचे मालक, खासगी गुंतवणूकदार आणि स्वामी भक्त निलेश मुणगेकर यांनी दहा हजार रुपयांची देणगी देऊन खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्या या मौल्यवान मदतीमुळे अन्नछत्रेतील समाजकार्य मार्गी लागतील आणि निलेश यांच्यासारखे इतरही स्वइच्छेने त्यांच्या-त्यांच्या परीने मदतीचा हात पुढे करतील यात शंका नाही.