Thursday, April 24, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीवैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे प्रतिनिधी,

– देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशंयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकारणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोव्हीड – 19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी डॉक्टरांची सेवा अधिष्ठाता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांच्याकडे अधिग्रहीत केल्या आहेत. तथापि अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुगणालय, पुणे यांनी आवश्यकतेनुसार अधिग्रहीत केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांची सेवा उपलब्ध करुन घ्यावी, सदर नियुक्ती केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांचे योग्य ते मानधन अदा करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
कोव्हीड – 19 साथीच्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झालेली असून ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्ण उपचारासाठी भरती होत आहेत. या रुग्णांना उत्कृष्ट उपचार होण्याच्या दृष्टीने व रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता कक्षामध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता भासू नये यासाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांनी बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख व प्राध्यापक डॉ.संयोगिता नाईक, व राजेंद्र गोळे यांची समन्वयक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली असल्याचे त्यांनी कळविले आहे.
..2
..2
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांनी डॉ.भूषण किन्होलकर, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9822097687 ), डॉ.सुमित अग्रवाल ,ऑस्टर ॲन्ड पर्ल हॉस्पिटल, पुणे ( मो.क्र. 9822886661 ), डॉ.मुकेश महाजन श्री हॉस्पिटल क्रिटी केअर ॲन्ड ट्रामा सेंटर,पुणे ( मो.क्र.9823231238 ) डॉ.श्रीपाद महाडिक पुना हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र.9552664589 ), डॉ.गणेश गोंगाटे, पुना हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9823219497 ) , डॉ.रविंद्र कुटे, पुना हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9840396455), डॉ.अरुणकुमार देशमुख, नोबेल हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9423006073), डॉ.देवाशिष बॅनर्जी, नोबेल हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 8766897988) , डॉ.रणजित देशमुख जहांगीर हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9767391703 ), डॉ.सुशिल गांधी ,जहांगीर हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9850932358 ) , डॉ.अश्पक बांगी, जीवनरेखा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, देहूरोड , पुणे ( मो.क्र. 7972700600 ) , डॉ.चेतन पाटील, एमएमएफ रत्ना हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र.9820267983), डॉ.राखी दत्ता, साधु वासवानी हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 8007200081 ),डॉ.शेफाली चव्हाण, साधु वासवानी हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 7756093545) , डॉ.श्रीपाद कोरे, विराज हॉस्पीटल, लोणीकाळभोर, पुणे ( मो.क्र.8999076147) इत्यादी डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करुन घेण्याबाबत कार्यालयीन आदेश पारित केलेला आहे.
0 0 0 0 0

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!