मनोरंजन संस्थेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी यांचे निधन

637

पुणे प्रतिनिधी,

 जेष्ठ रंगकर्मी,अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुणे शाखेचे माजी अध्यक्ष आणि मनोरंजन,पुणे(पब्लिसीटी) संस्थेचे संस्थापक-संचालक मनोहर चिंतामण कुलकर्णी( अण्णा) यांचे आज.दि.16 / 4 / 2020 रोजी पहाटे 5 वाजून 20 मिनीटानी वृद्धापकाळाने निधन झाले.ते ९२ वर्षांचे होते . ५० वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होते. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २००० साली शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार मिळाला होता. पुणे मनपाचा २०१७ सालचा बालगंधर्व पुरस्कार मिळाला होता . त्यांच्या मागे मोहन ,मदन हे दोन मुले ,मीना ही कन्या ,सून ,नातवंडे असा परिवार आहे .सांस्कृतिक क्षेत्राचा भक्कम आधार म्हणून ते ओळखले जात. मनोरंजन संस्थेचे संचालक मोहन कुलकर्णी यांचे ते पिता होत. सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंतांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. (मनोहर कुलकर्णी यांच्या पार्थिवावर सकाळी सुमारे साडे दहाच्या सुमारास अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत ).