यंगस्टर्सने तयार केले एक सेनसेशनल गाणं ‘मेरा भाई’

596

पुणे प्रतिनिधी,

भाई-भाई, भाईचारा, बंधु प्रेम असं आपण अनेकदा म्हणतो किंवा आपल्या मित्रासोबत, भावासोबत आपलं खास आणि एव्हरग्रीन असं नातं असतं आणि अशा बिनधास्त नात्याला सेलिब्रेट करण्यासाठी झी म्युझिक कंपनीने टॅलेंटेड गायक विकास नायडू आणि शुभम सिंह राजपूत यांच्या आवाजातील ‘मेरा भाई’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित केलं. अगदी कमी वेळेतच या गाण्याने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. हे गाणं प्रत्येकाला इतकं भावलं की युट्युब चॅनेलच्या टॉप १० यादीत त्याने स्थान मिळवलं, तसेच इतर सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सवरही त्या गाण्याची प्रचंड चर्चा झाली. या गाण्यात टॉपचे टिक टॉक स्टार्स विशाल पांड्ये आणि भाविन भानुशाली यांनी अभिनय केला आहे. नागपूरच्या विकास नायडूने हे गाणं गायले आहे आणि या गाण्याचं दिग्दर्शन देखील केले आहे.

हे सेनसेशनल गाणं ऐकता क्षणीच झी म्युझिकने हे गाणं लाँच करण्याचा निर्णय घेतला आणि या गाण्याला इंटरनेटच्या कानाकोप-यातून अनेक सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. विशाल आणि भाविन यांची या गाण्यात दाखवण्यात आलेली प्रभावी केमिस्ट्री देश-विदेशातील लाखो प्रेक्षकांनी पाहिली आणि त्यांनी ती आवडली सुध्दा.

विशाल आणि भाविन यांचे काही व्हिडीयो पाहून, त्यांची परफेक्ट ‘ब्रदर फ्रॉम अनदर मदर’ बाँडिंग पाहिल्यावर विकास नायडूला हे गाणं लिहिण्यासाठी प्रेरणा मिळाली आणि खरं तर सध्या जगात बंधू प्रेमाचे नाते हे दिवसेंदिवस मजबूत बनत चालले आहे. या गाण्याच्या टीम मधील आणखी एक युथ स्टार, यंग टॅलेंट म्हणजे नागपूरचा कास्टिंग आणि प्रोजेक्ट हेड विवेक उमरेडकर, याचा देखील या गाण्यात मोलाचा वाटा आहे. गायक, दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या विकास नायडूला या गाण्यामध्ये गायक शुभम सिंह राजपूत याने साथ दिली आहे.

गेल्या ४ दिवसांपासून टॉप १० गाण्यांच्या यादीत सतत ट्रेण्डिंगवर असणा-या आपल्या गाण्याचे होणारे कौतुक संपूर्ण टिमने पाहिलं आणि अनुभवलं. जेव्हा हे गाणं लॉन्च झालं तेव्हा पहिल्याच दिवशी या गाण्याला २.४ मिलिअन व्ह्युझ मिळाले होते आणि आतापर्यंत लाखो संगीत प्रेमींनी हे गाणं पाहिलं आहे.

गाण्याची निर्मिती, दिग्दर्शन, व्हिडीओग्राफी यांसारख्या अनेक तांत्रिंक गोष्टीं अतिशय योग्य पध्दतीने हाताळून विकास नायडूने पॉप्युलर टिक टॉक स्टार्ससोबत एक कॅमिओ रोल देखील साकारला आहे. या गाण्यासाठी प्रेक्षकांकडून मिळालेली प्रचंड लोकप्रियता अनुभवल्यानंतर, त्यांच्या मनोरंजनासाठी विकास लवकरच पॉप्युलर आणि टॅलेंटेंड यंगस्टर्स आणि कलाकारांसोबत आणखी बरेच म्युझिक व्हिडीयो घेऊन येणार आहे.

विकास नायडू हा त्याच्या यापूर्वीच्या म्युझिक व्हिडीयोंसाठी प्रसिध्द आहेच, पण आता त्याचे फॅन्स त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रतिक्षेत आहेत ज्याचे बोल/गीत विकास लिहिणार आहे आणि लवकरच बॉलिवूडसाठी आणखी एक हिट गाणे तयार करणार आहे.

विकास आणि त्याची टीम ‘नेक्स्ट वॉल्युअम प्रॉडक्शन्स’ झी म्युझिक आणि टी-सिरीजसोबत कोलॅबोरेशन करणार आहे, जेणेकरुन त्याचा आगामी प्रोजेक्ट हा डिजीटल मिडीया आणि टेलिव्हिजन प्लॅटफॉर्म्सवर जास्त ओरिजनल, पॉप्युलर आणि सुपरहिट गाणी तयार करु शकेल.