कोंढवा प्रतिनिधी,
कोंढवा येथील वेताळ मित्र मंडळाचे धडाडीचे तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश राजाराम सावंत वय (42) वर्षे यांचे आकस्मित निधन झाले आहे, त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, बहीणी,भाऊ , वहिनी वडील तसेच मामा मामी असा मोठा परिवार आहे.
महेश सावंत हे मंडळाच्या तसेच नागरिकांच्या मदतीला कायम तत्पर असत, त्यांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याचे मा. नगरसेवक भरत चौधरी यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.
महेश सामाजिक कार्यात सहभागी होऊन अडीअडचणीत नागरिकणांना मदत करत असत, त्यांच्या आकस्मित निधनाने तीव्र दु:ख झाल्याचे मा. आमदार महादेव बाबर यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
दरम्यान जमावबंदी, संचारबंदी असल्याने जवळचे नातेवाईक तसेच काही निवडक लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.