Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेमहापौरांमुळे 200 रिक्षाचालकांना मिळाले विमा कवच

महापौरांमुळे 200 रिक्षाचालकांना मिळाले विमा कवच

 पुनीत बालन ग्रुपचे सहकार्य
पुणे:–  कोरोनाशी सामना करतानाच शहरातील नागरिकांना वैद्यकीय मदत लागली तर, त्यासाठी रिक्षा उपलब्ध करून देणाऱया 200 चालकांना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आणि उद्योगपती पुनीत बालन यांच्या सहकार्याने प्रत्येकी सुमारे दिड लाख रुपयांचा आरोग्य विमा उपलब्ध झाला आहे.
ऑटो ग्लाईड, रिक्षा पंचायत, पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशन, वाहतूक पोलिस, आरटीओ आणि बाबा शिंदे यांच्या प्रयत्नांतून शहरात आपत्कालीन वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी 9859198591 या मोबाईल दूरध्वनी क्रमांकाद्वारे 25 मार्चपासून रिक्षा सेवा सुरू झाली आहे. सुमारे 225 रिक्षाचालक त्यात आहेत.
त्यातील 200 रिक्षा वाहतूक करतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे रिक्षाचालक सेवा पुरवितात. मात्र, त्यांना कोरोना किंवा अन्य कोणताही आजार झाल्यास कोणतेही विमा संरक्षण नव्हते. ही बाब समजल्यावर महापौर मोहोळ यांनी पुढाकार घेतला आणि बालन यांच्या सहकार्याने या रिक्षाचालकांना विमा काढून दिला.
नितीन पवार, बापू भावे, राहुल शितोळे, वाहतूक शाखेतील सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या उपस्थितीत महापौर मोहोळ आणि बालन यांच्या हस्ते विमा पॉलिसीचे इश्वर मंजरीकर, शैलेंद्र गाडे, इम्तियाज सय्यद, महेश पडवळ आणि छाया ओव्हाळ या  रिक्षाचालकांना प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.
मोहोळ म्हणाले, “कोरोनाचा सामना आपण सर्वजण संघटितपणे करीत आहोतच. आपल्या प्रयत्नांतून लवकरच आपण या संकटातून बाहेर पडू. पण, ज्यांना सध्या वैद्यकीय मदतीची गरज आहे, त्यांना रिक्षाचालक सेवा म्हणून मदत करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याची जाणीव शहराच्या इतिहासात नोंदली जाईल.”
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!