पोलीस, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मिळून करू कोंढवा ग्रीन झोन

765

अनिल चौधरी, पुणे

कोरोना विषाणूला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त वेंकटेशन यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हा प्रशासकीय यंत्रणा एकदिलाने व समन्वयाने कामकाज करीत आहेत. संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नियोजनपूर्वक आखणी करुन  तातडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु तरीदेखील पुणे शहरातील कोरोना ग्रस्त नागरिकांची संख्या वाढत असून कंटेनमेंट झोनची संख्या वाढत आहे. याच कंटेनमेंट झोन मध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला कोंढवा हा भाग येतो.

    कोरोनाचा फैलाव होऊन ५२ दिवस झाले. लॉकडाऊन होऊन अनेक नागरिकांचे आतोनात हाल झाले आहे. विशेष करून हातावर पोट असलेल्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. परराज्यातील मजूरांचे देखील हाल झाले , परंतु या कोंढव्यातील लोकप्रतिनिधी, समाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी मिळून काही परराज्यातील मजुरांची त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली. याला मोठ्या प्रमाणात साथ दिली ती कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी.कोंढवा परिसर कंटेनमेंट झोन असल्याने या परिसरातील दुकाने, उद्योगधंदे तसेच बांधकामे तसेच इतर असंख्य छोटे-मोठे व्यवसाय आज मोठ्या प्रमाणावर बंद आहेत. पण हे गेले काही दिवस सर्व बंद असल्याने आता नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. आणि आता सर्वाना आर्थिक चिंता सतावत आहेत. अशा वेळी सर्व व्यवसाय सुरु झाल्यास आर्थिक देवान घेवाण होऊन आर्थिक तसेच अर्थव्यवस्थेला थोडी चालना देखील मिळेल.

    आज कोथरूड सारखा भाग पूर्णपणे ग्रीन झोन आहे. तिथे एकही रुग्ण नसल्याची नोदं होत आहे. हे का झाले ? कसे झाले? …. कसे शक्य आहे.?    कारण येथील लोकांनी पाळलेली स्वयंशिस्त…. लॉकडाऊनची घोषणा माननीय पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनी करताच लोकांनी स्वयंशिस्त पाळली. आणि कोणीही घराबाहेर पडले नाही फक्त अति आवश्यक काम असेल तर लॉक बाहेर पडले याचा चांगला परिणाम होऊन येथे पहावयास मिळाला. आणि हा संपूर्ण परिसर ग्रीन झोन झाला.

   आता वेळ आली आहे आपला कोंढवा ग्रीन झोन म्हणजेच कंटेनमेंट झोन (कोरोना मुक्त) करण्याची. प्रशासन, पोलीस आपल्या परीने लोकांची काळजी घेत आहे तसे त्यांनी पत्रे लावून रस्ते देखील सील केले आहेत, परंतु काही नागरिक आम्हाला काय , आम्हाला काय होत नाही, आम्ही घरात बसूच शकत नाही असे म्हणून रस्त्यावर फिरत आहेत. पोलीस कारवाई करत आहेत परंतु पोलिसांचा डोळा चुकवून किंवा काहीतरी थातूरमातुर कारणे सांगून लोक विनाकारण दुचाकी, चारचाकी तसेच चालत फिरताना या भागात दिसत आहे जे कि अत्यंत धोकादायक आहे. कोरोना व्हायरस जातपात धर्म पाहात नाही , अत्यंत घातक असा रोग आहे. आपले आरोग्य कर्मचारी रांत्रदिवस लोकांची सेवा करत आहेत. परंतु काही मुठभर लोकांमुळे कोरोनाचे संक्रमण होत आहे.

   आता वेळ आली आहे भागातील सर्व लोकप्रतिनिधी, समाजिक कार्यकर्ते, पोलीस, पत्रकार आणि प्रशासन यांनी एकत्रित येऊन हा परिसर ग्रीन झोन कसा होईल. या परिसारात वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे विविध विचार असलेले लोकप्रतिनधी आहेत. यामध्ये आजी माजी तसेच काही विद्यमान माननीय सदस्य आहेत. अशा सर्वांनी आता एकत्र येऊन कुठलाही राजकीय विचार न करता तसेच कुठलेही जाती धर्माची सिमा न बाळगता एकत्र येऊन कोंढवा परिसर ग्रीन कसा होईल याचाच विचार करून आता वाटचाल केली पाहिजे.

विशेषतः कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी याकामी पुढाकार घेऊन सर्व लोकप्रतिनिधी, सामजिक कार्यकर्ते, पोलीस आणि पालिका प्रशासन यांची सयुंक्त बैठक घेऊन खालील उपाय जर केले तर आपण आपला परिसर नक्कीच कोरोना मुक्त म्हणजेच ग्रीन झोन करण्याची एक सुरुवात होईल.

नगरसेतू’ मोबाईल ॲप विकसित करुन जीवनाश्यक वस्तू ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम राबवू.

कोरोना विषाणूचा प्रसार थांबवायचा असेल तर नागरिकांनी प्रथम गर्दी करणे टाळायला हवी. फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये, घराच्या बाहेर न पडता जीवनावश्यक वस्तूची खरेदी ऑनलाईन करण्यासाठी या ॲपचा वापर करावा असे आवाहन आपण नागरिकांना करू तसे त्याना पटवून देऊ.

     या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना किराणा, भाजीपाला, फळे, औषधे, दूध, स्वस्त धान्य जीवनावश्यक वस्तूची ऑनलाईन आर्डर करुन खरेदी करता येईल. जीवनावश्यक वस्तूची ऑनलाईन आर्डर दिल्यानंतर एकातासात औषधे आणि आठ तासाच्या आत किराणा माल स्वंयसेवकामार्फत घरपोच पाठविण्यात येण्याची व्यवस्था करू.

याकरिता जवळपास १००स्वयंसेवकाची नेमणूक करून  घरपोच वस्तू वितरित करण्याच्या अनुषंगाने त्यांना ओळखपत्रही देण्यात यावे. या ॲपला शहरातील किराणा मालाची  जास्तीत जास्त दुकाने, औषधांचीदेखील  जस्तीत जास्त दुकाने जोडण्यात यावीत. नागरिकांनी ऑनलाईन ऑर्डर दिल्यांनतर दुकानदार व स्वयंसेवक यांना एसएमएसच्या माध्यमातून समजले जाईल. त्यांनतर दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीद्वारे माल कधी मिळेल यांची ऑर्डर करणाऱ्या नागरिकाला कल्पना दिली जाईल. या ॲपमध्ये नागरिकांला देयक ऑनलाईन किंवा रोखीने देण्याची व्यवस्था करण्यात यावी. नागरिकांना नगरसेतू ॲप स्वतःच्या मोबाईल मध्ये लिंकवर देऊन क्लिक करुन डाऊनलोड करता येईल याची माहिती दिली जाईल. ॲप डॉऊनलोड केल्यानंतर नागरिकांनी आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक व पत्ता याबाबत माहिती  भरणे गरजेचे आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन मध्ये प्रवेश केल्यानंतर आपणास कोरोना विषाणूच्या विषयी माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेले आरोग्यसेतूॲप डॉऊनलोड करण्याबाबतची लिंक देण्यात आलेली आहे याची माहिती द्यावी. ॲपच्या  मेनूमध्ये दुकानदारांचे नाव, डॉक्टरांचे व दवाखान्याचे नाव, रुग्णवाहिका असणाऱ्यां दवाखान्याचे नाव, औषधालयाचे नाव व पत्ता, दुग्धालयाचे नाव, पोलीस स्टेशनचे नावाबरोबरच संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात यावेत. या ॲप माध्यमातून घरपोच सेवा मिळू लागल्याने गर्दी कमी होण्यास मदत होत होईल. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अंदाजे 90 टक्के कमी होईल. परिणामी एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळणार  नसल्याची याची खात्री आहे. परिणामी कोंढवा पोलीस ठाण्याचा परिसर कोरोनामुक्त ठेवण्याचे संपूर्ण श्रेय कोंढवा वासियांना लोकप्रतिनिधी, समाजिक कार्यकर्ते पोलिसांना देण्यात येईल.

असा जर आपला कोंढवा पॅटर्न राबविला तर आपण नक्कीच कोंढवा ग्रीन झोन मध्ये आणू.