पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात प्रथम क्रमांकाची मते मिळतील

350

महा ठोका संघटनेचे अपक्ष उमेदवार सर्जेराव जाधव यांचा विश्वास

पुणे, प्रतिनिधी :
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, महा ठोका संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी लढणारे शिक्षक सर्जेराव जाधव हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, निवडणुकीत प्रथम क्रमांकाची सर्वाधिक मते मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महा ठोका ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणारी शिक्षक संघटना आहे. सर्जेराव जाधव हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. संघटनेच्या माध्यमातून
त्यांनी सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांचे मार्गे लावले आहेत. पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे अनेकदा आंदोलने, उपोषणे करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. सन 2009 पासून सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या मान्यता मिळत नव्हत्या. तसेच त्यांना पगारही मिळत नव्हता. त्यांना मान्यता मिळवून देण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले. सोलापूर जिल्ह्यात मान्यता शिबिर लावून जिल्ह्यातील 367 शिक्षकांना व रयत शिक्षण संस्थेच्या 56 शिक्षकांना मान्यता देण्यास भाग पाडले. अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करण्यासाठी शासन आदेश काढण्यात प्रयत्न करून अनेक शिक्षकांना पूर्णवेळ मान्यता मिळवून दिल्या. रयत शिक्षण संस्थेच्या अनुकंपा तत्वावरील शिक्षक आणि लिपिक यांना मान्यता मिळवून दिल्या. तसेच बऱ्याच संस्थांमध्ये वाद असल्याने शाळा चालवण्यासाठी समन्वय साधून प्रशासकीय काम करण्यास मदत केली. विनाअनुदान तत्त्वावर बदली केलेल्या कर्मचाऱ्यांना मान्यता मिळावी, यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे येथे ठिय्या आंदोलन व उपोषण करून मान्यता देण्यासाठी भाग पाडले. अनेक शिक्षकांची उच्च न्यायालयात प्रकरणे असल्याने शिक्षण विभागाला शासन परिपत्रकानुसार सुनावणी घेऊन मान्यता देण्यास भाग पाडले.
सर्जेराव जाधव यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातील अनेक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. कुणाच्या दबावाला बळी न पडता, कुठल्याही राजकीय पक्षाचे लेबल न लावता केलेल्या कामावर भर देत आपण निवडणुकीला सामोरे जात असल्याचे जाधव यांनी सांगितले. शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यात आपण वीस वर्षे खर्च केले आहेत, त्यामुळे सामान्य शिक्षक आपल्यालाच मतदान करतील, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.

निवडून आल्यास ही कामे करणार

1) खाजगी संस्थांना तीन अपत्ये हा जीआर लागू नाही, त्यामुळे विनाकारण दडपण आणणारा जीआर रद्द करणे
2) विनाअनुदानित शाळा किंवा तुकडी वरून अनुदानित शाळेवर बदली केल्यानंतर वेतन श्रेणी बदल नसताना वर्ष वाढीनुसार असणारा 20%, 40% हा जीआर न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करणे
3) विनाअनुदानित शाळेतील किंवा तुकडी वरील शिक्षक, विद्यार्थी संख्या कमी झाल्यास त्यास अतिरिक्त ठरवून त्यांना लगतच्या किंवा त्यांच्या संस्थेच्या अनुदानित शाळेत समावेश करून घेणे
4) विनाअनुदानित शाळा किंवा तुकड्या यावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना 100% वेतन अनुदानित शाळाप्रमाणे द्यावे
5) विशेष शिक्षक – कला, क्रीडा, संगीत यांच्या सेवकसंचात पदनिर्मिती करून त्यांच्या नियुक्त्या करणे
6) विनाअनुदानित शाळेतील सध्या कार्यरत शिक्षकांचे गोठवलेले 18 महिन्याचे वेतन मिळवून देणे
7) मुख्याध्यापक पदाचा कार्यकाळ पाच वर्षापेक्षा जास्त असल्यास डी.एस.एम. पदविका लागू अन्यथा रद्द करावी, त्यांना सवलत द्यावी.
8) एकाच संस्थेतील विनाअनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांना अनुदानित माध्यमिक शाळेत बदली करण्यास शासन निर्णय काढायला भाग पाडू
9) शिक्षण सेवकांच्या / घड्याळी तासिका मानधनात केंद्र सरकारच्या नियमानुसार कमीत कमी मानधन देण्याबाबत शासनाला भाग पाडू
10) मेडिकल बिल कॅशलेस प्रणाली सुरू करण्यास आणि कोरोना आजार मेडिकल बिलासाठी ग्राह्य धरण्यात भाग पाडू
11) रात्र शाळा आणि आय सी टी शिक्षक यांना पूर्णवेळ कार्यभार देऊन काम करणे

महाविद्यालयीन कामे

1) दिलेल्या वेतन आयोगाची काटेकोर अंमलबजावणी करणे
2) अर्ज केलेल्या इच्छुकांना स्थान निश्चिती याची जबाबदारी शिक्षण सहसंचालक/ विद्यापीठावर टाकू
3) स्किल बेस्ड कोर्सच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू
4) विद्यार्थी केंद्रीय कोर्सेस पुन्हा प्रवाहात आणणे
5) स्थानिक व्यवस्थापनाच्या किंवा प्रशासनाच्या सोयीनुसार पाच दिवसाचा आठवडा करणे
6) आरोग्य विमा, अपघात विमा, वैद्यकीय विमा कॅशलेस प्रणाली वापरून करणे
7) करार पद्धत रद्द करणे
8) रिक्त प्राध्यापक व शिक्षकेतर पदे भरणे
9) प्राचार्य नियुक्ती कायमस्वरूपी करण्यासाठी युजीसी व महाराष्ट्र सरकार यांना भाग पाडू
10) 71 दिवस परीक्षा कामावरील बहिष्कार कालावधीतील वेतन काढण्यास शासनाला भाग पाडू
11) एन ई पी मधील जाचक अटी रद्द करण्यासाठी पाठपुरावा करू