Monday, April 28, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेकर्तव्य सामाजिक संस्थे तर्फे देवदासी महिलांना साडी वाटप करून साजरी केली...

कर्तव्य सामाजिक संस्थे तर्फे देवदासी महिलांना साडी वाटप करून साजरी केली भाऊबीज

कर्तव्य सामाजिक संस्थेची देवदासी महिलांसोबत दिवाळी  

पुणे :  कर्तव्य सामाजिक संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही दिवाळी शिबीर अंतर्गत कर्तव्य सामाजिक संस्थचे अध्यक्ष सौरभ बाळासाहेब अमराळे यांच्या संकल्पनेतून आयोजित भाऊबीज निमित्त एक साडी बहिणीसाठी, हा उपक्रम राबवित देवदासी महिलांना  साडी वाटप करून  देवदासी महिलांसोबत भाऊबीज साजरी केली.
सध्या कोरोना मुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहे तर अनेकांच्या नोकर्‍याही गेल्या आहेत. यातच रेडलाईट भागातील महिलांवर ही कोरोना संकटाचा प्रभाव पडला असून येथील देवदासी महिलांनाही याचा फटका बसला आहे. त्यमुळेच एक मदतीचा हात म्हणून देवदासी महिलांची ही दिवाळी सुखाची व्हावी याच उद्देशाने  बाटा गल्ली ,बुधवार पेठ ,पुणे  येथे आज मंगळवार सांयकाळी 4.30 वा. रोजी भाऊबीज निमित्त एक साडी बहिणीसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कृष्णाजीराजे नाईक बांदल यांचे वंशज करणसिंह बांदल, फर्जंद व फत्तेशिकस्त या सिनेमांचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, सुश्रृत मंकणी,  बिपीन सुर्वे, गणेश खुटवड फरासखाना पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक सावंत, सौरभ बाळासाहेब अमराळे (अध्यक्ष : कर्तव्य सामाजिक संस्था), अलकाताई गुजनाळ (उपाध्यक्ष : कर्तव्य सामाजिक संस्था), करणसिंह मोहिते , अभिजीत चव्हाण , सागर डोंगरे ,अक्षय नवगिरे सहीत पोलिस कर्मचारी यांच्या हस्ते देवदासी महिलांना साडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन  कर्तव्य सामाजिक संस्थेच्यावतीने करण्यात आले असून सुमारे 200 महिलांना साडी वाटप करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!