जागितक महिला दिनानिमित्त ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने महिलांचा सन्मान

748

अनिल चौधरी, पुणे

जागतिक महिला दिन ब्रम्हमुहूर्त  योग ज्ञानपीठ केंद्र कोंढवा हॉल मध्ये अतिशय आनंदात आणि उत्सहात साजरा करण्यात आला. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा  लावून अग्रेसर आहेत , आंतराळापासून ते घरकामामध्ये त्या सर्वात पुढे आहेत. तसेच आमच्या ब्रम्हमुहूर्त योग केंद्रात तर एकापेक्षा एक अशा सरस महिला योगा कोचर आहेत , त्यांच्या  योग कलेला जगात कुठेच तोड नाही, तर प्रत्येक स्त्रीला आमच्या तर्फे कायमच सन्मान केला जातो, असे मत माजी नगरसेवक तानाजी लोणकर व प्रसिद्ध युवा उद्योजक राजेंद्र भिंताडे यांनी केंद्रातील महिलांचा सन्मान करताना व्यक्त केले.


       जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोंढवा हॉलमध्ये टीम मेम्बर विजय लोणकर व कालिदास लोणकर  यांच्या साह्याने ब्रम्हमुहूर्त योग  ज्ञानपीठ केंद्रामधील प्रत्येक महिला साधकाला, पुरुष साधकांच्या हस्ते  गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.  
   याप्रसंगी केंद्राच्या अध्यक्षा अश्विनी पासलकर यांचा पुणेरी पगडी ,शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना पासलकर म्हणाल्या कि, आपल्या बी वाय डी के परिवारात महिलांचा कायम सन्मान करण्यात येतो. या केंद्रामध्ये  महिलांना एक उच्च असे स्थान आहे. गुरुदेव श्री. दीपक महाराज यांना कायम महिलांचा आदर आहे, ते नेहमी आम्हाला महिलांचा सन्मान विषयी मार्गदर्शन करत असतात. यावेळी नगरसेविका नंदा लोणकर यांनी महिलांना मार्गदर्शन करून  महिलांना प्रोत्सोहान देण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उभारणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी कोंढवा हॉलचे साधक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.